Attack on a Hindu temple in British Columbia province of Canada. Dainik Gomantak
ग्लोबल

Hindu Temple Vandalized : कॅनडामध्ये पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला; खलिस्तानी दहशतवाद्यांनी केली तोडफोड

Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हा सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबचा प्रमुख होता. गुरुद्वाराच्या आवारातच 18 जून रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

Ashutosh Masgaunde

Attack on a Hindu temple in British Columbia province of Canada:

कॅनडात पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ठार झालेला खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar) याचे पोस्टर मंदिराच्या गेटवर चिकटवण्यात आल्याने, हा हल्ला खलिस्तान समर्थकांकडूनही करण्यात आला असा आरोप केला जात आहे. ही घटना कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील आहे.

ज्या मंदिराला लक्ष्य करण्यात आले ते सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिर आहे.(Lakshmi Narayan Temple in Surrey) ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील हे सर्वात जुने आणि सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे.

मंदिराच्या गेटवर खलिस्तान सार्वमताचे पोस्टर लावण्यात आले असून, त्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा फोटोही दिसत आहे. पोस्टरवर 'कॅनडा 18 जून रोजी झालेल्या हत्येच्या घटनेत भारताच्या भूमिकेची चौकशी करत आहे' असे लिहिले होते.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हा सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबचा प्रमुख होता.

गुरुद्वाराच्या आवारातच 18 जून रोजी सायंकाळी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा (Khalistan Tiger Force) प्रमुख होता.

हिंदू मंदिरावरील हल्ल्याची या वर्षातील तिसरी घटना

कॅनडात हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षीच हिंदू मंदिरावर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी 31 जानेवारी रोजी कॅनडातील ब्रॅम्प्टन भागातील एका प्रसिद्ध हिंदू मंदिराला लक्ष्य करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायानेही यावर आक्षेप घेतला होता. ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

यानंतर एप्रिलमध्ये कॅनडातील ओंटारियो येथे एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. खलिस्तान समर्थकांवरही त्यांचे आरोप झाले. कॅनडातील भारतीय दूतावासानेही (Indian Embassy in Canada) यावर आक्षेप घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT