US Storm Dainik Gomantak
ग्लोबल

US Storm Video: अमेरिकेच्या 11 राज्यांमध्ये वादळाचा कहर, 32 जणांचा मृत्यू

आर्कान्सासमध्ये हाय-स्पीड चक्रीवादळामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेत रोज एक ना एक नैसर्गिक आपत्ती येत आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य पश्चिमेकडून ईशान्येकडे सरकणाऱ्या वादळामुळे झालेल्या विनाशात जवळपास 32 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 मार्च रोजी अमेरिकेतील आर्कान्सा आणि इलिनॉयला धडकलेल्या धोकादायक वादळाने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. आर्कान्सासमध्ये हाय-स्पीड चक्रीवादळामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत.

इलिनॉयमध्ये एका मैफिलीदरम्यान, थिएटरचे छत कोसळले, ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला आणि 28 लोक जखमी झाले. वादळामुळे वेन, आर्कान्सासमध्येही मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. यासह 2 एप्रिल रोजी मृतांचा आकडा वाढून 32 झाला आहे.

आम्ही नुकसानीच्या संपूर्ण मूल्यांकन करत आहोत. आम्हाला माहित आहे की संपूर्ण अमेरिकेतील कुटुंबे आपल्या प्रियजनांच्या नुकसानामुळे शोक करीत आहेत. असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

आर्कान्सासमध्ये, राज्यपाल साराह हकाबी सँडर्स यांनी आणीबाणी घोषित केली होती आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल गार्ड सक्रिय केलेत. यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील सुमारे 11 राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

डेलावेअर जवळील चक्रीवादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. याबाबत नॅशनल वेदर सर्व्हिसने रविवारी पुष्टी केली आहे. शनिवारी रात्री वादळामुळे खराब झालेल्या घरात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. मृतांमध्ये एका टेनेसी काउंटीमधील किमान नऊ, इंडियानामधील पाच आणि इलिनॉयमधील चार जणांचा समावेश आहे. असे डेलावेर राज्य पोलिसांनी सांगितले.

अलाबामा आणि मिसिसिपीमध्ये 31 मार्च ते 1 एप्रिलच्या रात्री चक्रीवादळामुळे अनेकजणांचा मृत्यू झाला. वेन आणि आर्कान्सामधील एका हायस्कूलचे छत कोसळले होते. या वादळामुळे येथे किमान चार जणांचा मृत्यू झाला. या वादळामुळे आर्कान्सा राज्यातील सुमारे 90 हजार घरांची वीज गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT