Boat Capsizes Near Philippines Dainik Gomantak
ग्लोबल

Philippines Boat Accident: फिलिपाइन्समध्ये बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू

Philippines: फिलीपिन्समधील सागरी सुरक्षा चिंतेचा विषय आहे. अनेकवेळा बोटी गर्दीने भरलेल्या असतात आणि बऱ्याच जुन्या बोटी अजूनही वापरात आहेत.

Ashutosh Masgaunde

Boat Capsizes Near Philippines: फिलिपाइन्सची राजधानी मनिलाजवळील तलावात बोट उलटून ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 40 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.

फिलिपाइन्स कोस्ट गार्ड (PCG) ने सांगितले की, बिनगोनानचे कालिनावनपासून सुमारे 50 यार्डांवर बोट पलटी झाली.

राजधानी मनिला पासून फक्त दोन तासांच्या अंतरावर बिनांगोनन हे किनारपट्टीवरील शहर आहे.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे एकच्या सुमारास घडली. फिलिपिन्स तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार जोरदार वाऱ्यामुळे मोटर बोट उलटली, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. या भागात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, असे वृत्त फिलिपाइन्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

जेव्हा लोक जोरदार वाऱ्यामुळे बोटीच्या एका बाजूला जमा झाले, तेव्हा बोट झुकली आणि तिचा आउटरिगर तुटला, त्यानंतर लगेचच बोट उलटली, असे पोलिस आणि तटरक्षकांनी सांगितले.

या बोटीत जास्तीत जास्त ४२ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य प्रवास करु शकता. पण ते ओव्हरलोड होते. सुरक्षा नियमांनुसार अनेक प्रवाशांनी लाइफ वेस्ट घातल्या नसल्याचे समोर येत आहे.

फिलीपिन्सचा सागरी सुरक्षेसाठी खराब रेकॉर्ड आहे, अनेकवेळा बोटी गर्दीने भरलेल्या असतात आणि बरीच जुन्या बोटी अजूनही वापरात आहेत.

फिलीपिन्स हा 7,600 पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह आहे. या आठवड्यात डॉक्सुरीन चक्रीवादळाचा तडाखा बसला ज्याने त्याच्या उत्तरेकडील आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या लुझोन बेटावर 175 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते.

डोक्सुरी चक्रीवादळाने फिलिपाइन्स सोडल्यानंतर काही बोटींना गुरुवारी प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT