Niger School Dainik Gomantak
ग्लोबल

नायजरमधील शाळेत भीषण आग, 20 मुले ठार

नायजरमधील (Niger) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर मराडी (Maradi) येथील एका शाळेला भीषण आग (Niger School Fire) लागली.

दैनिक गोमन्तक

नायजरमधील (Niger) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मराडी (Maradi) मधील एका शाळेला भीषण आग (Niger School Fire) लागली. यामुळे 20 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर बरचेजण जखमीही झाले आहेत. एएफएन प्री-स्कूल आणि प्राथमिक शाळेला आग लागल्याने पेंढ्यापासून बनवलेले तीन वर्ग जळून खाक झाल्याचे सरकारने सोमवारी उशिरा सांगितले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन ते आठ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रादेशिक निर्देशाने आगीचे कारण आणि ती कशी लागली याची पुष्टी केली. याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु करण्यात आला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

नायजर, पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) गर्दीच्या शाळांमध्ये स्ट्रॉ झोपड्यांचा वापर तात्पुरत्या वर्गखोल्या म्हणून केला जातो. एप्रिलमध्ये नायजरची राजधानी नियामीच्या (Niamey) बाहेरील प्राथमिक शाळेत जोरदार वाऱ्यामुळे लागलेल्या आगीत 20 मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान शिक्षक आणि पालकांनी म्हटले आहे की, मृत्यू तात्पुरत्या वर्गखोल्यांच्या धोक्यांवर प्रकाश टाकतात. युनिसेफ (UNICEF) या संयुक्त राष्ट्र संघटनेने (United Nations) या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पश्चिम आफ्रिकेतील या गरीब देशाला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र अनेक योजना राबवते.

युनिसेफच्या प्रतिनिधीने या घटनेबाबत ही माहिती दिली

नायजरमधील युनिसेफचे प्रतिनिधी स्टेफानो सावी (Stefano Savi) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही या आगीमुळे बाधित मुले आणि कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत. पीडितांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या समुदायांप्रती आमच्या संवेदना आहे.'' ते पुढे म्हणाले, ''शाळेत शिकत असताना कोणत्याही मुलाला कधीही धोका होता कामा नये. मुले शाळेत जाऊ शकतील आणि सुरक्षित वातावरणात शिकू शकतील याची खात्री करण्यासाठी युनिसेफ देशभरातील राष्ट्रीय अधिकारी आणि भागीदारांसोबत काम करत राहील.

ऑगस्टमध्ये 14 मुलांची हत्या

याआधी ऑगस्टमध्ये दक्षिण-पश्चिम नायजरमधील एका गावात सशस्त्र लोकांनी केलेल्या हल्ल्यात 14 मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या वर्षातच या भागात दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकांची हत्या केली आहे. मालीच्या नायजरच्या सीमेजवळील तिलबेरी प्रदेशातील बानीबांगोच्या कम्युनमध्ये सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. एका स्थानिक अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, लोक दुपारी शेतात काम करत असताना हल्लेखोर "मोटारसायकलवरुन डेरे-डे गावात आले होते".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT