Rupert Murdoch Dainik Gomantak
ग्लोबल

पुन्हा काडीमोड! 91 वर्षीय उद्योगपती घेणार चौथ्यांदा घटस्फोट

91 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक यांनी मॉडेल अॅक्टर पत्नी जेरी हॉलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन-अमेरिकन बिझनेस टायकून आणि मीडिया मोगल म्हणून जगभरात ओळखले जाणारे रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) पुन्हा एकदा घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. सहा वर्षांपूर्वी मर्डोक यांनी चौथ्यांदा लग्नगाठ बांधली होती. 91 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक यांनी मॉडेल अॅक्टर पत्नी जेरी हॉलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही त्यांचे 6 वर्षांचे लग्न मोडणार आहेत आणि लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करतील. 91 वर्षीय मीडिया मोगल रुपर्ट मर्डोकने 2016 मध्ये 65 वर्षीय मॉडेलसोबत लग्न केले. (At 91 media baron Rupert Murdoch is getting a fourth divorce)

मर्डोकने मार्च 2016 मध्ये लंडनमध्ये जेरीशी लग्न केले होते. फॉक्स कॉर्पचे अध्यक्ष आणि त्यांची माजी सुपरमॉडेल पत्नी जेरी यांचे लग्न तेव्हा वृत्तपत्रांमध्ये खुप प्रसिद्ध झाले होते. गेल्या वर्षी मर्डोकने न्यूयॉर्कच्या टॅव्हर्न ऑन द ग्रीनमध्ये त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला आहे. मर्डोकच्या मीडिया व्यवसायांमध्ये फॉक्स कॉर्पोरेशन, फॉक्स न्यूज चॅनेलची मूळ कंपनी आणि वॉल स्ट्रीट जर्नल्स न्यूज कॉर्प (NWSA.O) यांचा देखील समावेश आहे.

पहिले लग्न पॅट्रिशिया बुकरशी झाले

रुपर्ट मर्डोकचे पहिले लग्न पॅट्रिशिया बुकरशी झाले होते तर ते 1956 ते 1967 पर्यंत चालले. यानंतर दुसरे लग्न अण्णा मारिया टोर्वशी झाले आणि ते 1967 ते 1999 पर्यंत चालले. यानंतर मर्डोकने 1999 मध्ये वेंडी डेंगसोबत तिसरे लग्न केले आणि ते 2013 पर्यंत चालले होते. मर्डोकने 2016 मध्ये जेरी हॉल लग्न केले. जेरीने 'बॅटमॅन' आणि 'द ग्रॅज्युएट' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तसेच मर्डोकच्या आधी, जेरी हॉलने रॉक स्टार आणि गायक मिक जॅगरशी लग्न केले होते.

मर्डॉक आणि जेरी यांना 10 मुले आहेत

जेरी आणि मर्डोक यांना आतापर्यंत एकूण 10 मुले आहेत, तसेच दोघांचेही आतापर्यंत वेगवेगळे लग्न झाले आहे.

जेरीसोबत लग्नाच्या वेळी त्याने आनंद व्यक्त केला होता,

त्यानंतर मर्डोक यांनी ट्विट केले आणि म्हटले की, 'मी जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असल्याचे समजतो. आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की असे काय घडले आहे की सहा वर्षांनंतर मर्डोकयांना जेरीपासून घटस्फोटाकडे वाटचाल करावी लागली.

नुकतेच चर्चेत असलेले हे घटस्फोट

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी नुकतेच घटस्फोट घेतला. शिवाय जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांच्यातही घटस्फोटही झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT