Asim Munir
Asim Munir Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Army Chief: सय्यद असीम मुनीर बनले पाक लष्कराचे नवे जनरल

दैनिक गोमन्तक

Pakistan Army New Chief: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज पाकिस्तानला नवा लष्करप्रमुख मिळाला आहे. असीम मुनीर यांच्याकडे पाक लष्कराची कमान देण्यात आली आहे. तर शमशाद मिर्झा आता लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ असतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.

दरम्यान, लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्कराचे (Pakistan Army) नवे प्रमुख असतील. ते सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील, जे 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांना लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे."

दुसरीकडे, लेफ्टनंट जनरल मुनीर यांना फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. तर जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडियर म्हणून दलाची कमान घेतल्यापासून ते बाहेर जाणार्‍या सीओएएसचे जवळचे सहकारी राहीले. जनरल बाजवा हे त्यावेळी एक्स कॉर्प्सचे कमांडर होते.

मुनीर हे आयएसआय प्रमुख राहिले आहेत

2017 च्या सुरुवातीला मुनीर यांना लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना ISI प्रमुख बनवण्यात आले. तथापि, सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ हा आतापर्यंतचा सर्वात लहान ठरला, कारण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आग्रहावरुन त्यांची आठ महिन्यांच्या आत लेफ्टनंट-जनरल फैझ हमीद यांनी बदली केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT