Asaduddin Owaisi Dainik Gomantak
ग्लोबल

Asaduddin Owaisi: धर्माचं नाव घेऊन लोकांची हत्या केली जातेय... बहारीनमध्ये असदुद्दीन ओवेसींनी फाडला पाकिस्तानचा बुरखा

Asaduddin Owaisi On Terrorism: ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करत आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहारीनला पोहोचले.

Manish Jadhav

ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करत आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहारीनला पोहोचले. जिथे शिष्टमंडळाने भारताची बाजू मांडली आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला. यादरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.

ओवेसी म्हणाले की, 'पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी भारतातील निष्पाप लोकांच्या हत्येचे समर्थन केले. ते कुराणातील आयतींचा चुकीचा संदर्भ देत आहेत. दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना धर्म विचारुन मारले. इस्लाम दहशतवादाचा (Terrorism) निषेध करतो. कुराण स्पष्टपणे सांगते की, एखाद्या निष्पाप व्यक्तीची हत्या करणे हे संपूर्ण मानवजातीला मारण्यासारखे आहे.'

पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्ट टाकावे

ओवेसी पुढे म्हणाले की, आमच्या देशात आमचे राजकीय मतभेद आहेत, पण जेव्हा आमच्या देशाच्या अखंडतेचा प्रश्न येतो तेव्हा आमच्या शेजारी देशाने हे समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी आशा करतो की बहारीन सरकार पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी मदत करेल. पाकिस्तान या पैशांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना फंडिंग करतो.

आमच्या सरकारने प्रत्येक भारतीयाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, पुढच्या वेळी जेव्हा पाकिस्तान नापाक हरकत करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याने कल्पनाही केली नसेल असे उत्तर दिले जाईल, असेही ओवेसी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आमच्या सरकारने आम्हाला येथे पाठवले आहे. जगाला हे कळावे की, गेल्या अनेक वर्षांपासून भारत कोणत्या धोक्याचा सामना करत आहे. दुर्दैवाने, आम्ही अनेक निष्पाप लोकांचे प्राण गमावले. पाकिस्तानच भारतात नापाक हरकती करतो. जोपर्यंत पाकिस्तान या दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि प्रायोजित करणे थांबवत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही.'

जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला

भारतीय शिष्टमंडळे जगभरातील 33 देशांना भेट देणार असून पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा जगासमोर आणत आहेत. बहारीनला पोहोचलेल्या पथकाचे नेतृत्व बैजयंत पांडा करत आहेत. या शिष्टमंडळात भाजप खासदार निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, एनजेपी खासदार रेखा शर्मा, एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, खासदार सतनाम सिंह संधू, गुलाम नबी आझाद आणि राजदूत हर्ष श्रृंगला यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Khola Chilli: खोला मिरची होणार ‘तिखट’! मान्सूनोत्तर पावसाचा परिणाम; यंदा दर वाढण्याची शक्यता

Goa Opinion : आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

SCROLL FOR NEXT