ग्लोबल

पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळला तब्बल 1.8 दशलक्ष वर्षे जुना आदिमानव प्रजातीचा दात

गोमन्तक डिजिटल टीम

पृथ्वीवरून आदिमानवांचे अस्तित्व नष्ट होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. पृथ्वीबाबत अनेक रहस्य वेळोवेळी देश-विदेशातून समोर येत असतात. पुरातत्वशास्त्रज्ञांना जॉर्जियामध्ये आदिमानव प्रजातीचा एक दात सापडला आहे. हा दात तब्बल 1.8 दशलक्ष वर्षे जुना असल्याचा दावा करण्यात आला आहे. राजधानी तिबिलिसीपासून 100 किलोमीटर नैऋत्येस असलेल्या ओरोझमनी गावात खोदकामाच्या जागेजवळ एका संशोधक विद्यार्थ्याला हा दात आढळून आली. (Archaeologists Discover 1.8 Million-Year-Old Human Tooth In Georgia)

द गार्डियनने या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ओरोझमनी हे गाव दमानीसीच्या जवळ आहे. याठिकाणी 1990 च्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला 1.8 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मानवी कवट्या सापडल्या होत्या.

श्री कोपलियानी आणि त्यांच्या टीमने 2019 मध्ये ओरोझमनी येथे खोदकाम सुरू केले. कोरोनामुळे 2020 मध्ये ते थांबवण्यात आले. या टीमने गेल्या वर्षी पुन्हा खोदकाम सुरू केले. खोदकामात आत्तापर्यंत प्रागैतिहासिक दगडांची साधने आणि नामशेष झालेल्या प्रजातींचे अवशेष तसेच, साबर-दात असलेली मांजरी आणि एट्रस्कन लांडगे सापडले आहेत.

श्री कोपलियानी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात सापडलेला हा दात आफ्रिकेच्या बाहेर सापडलेल्या सुरुवातीच्या मानवी प्रजातींचा सर्वात जुना पुरावा आहे.

आणखी एक आठवडा ओरोझमनी साइटचे उत्खनन सुरू ठेवले जाणार आहे. तसेच, खोदाई क्षेत्राचे विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT