Land Grabbing Case : 'जमीन हडप प्रकरणात 'त्या' मंत्र्याचे गिरीश चोडणकरांशी साटेलोटे'

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची तृणमूल काँग्रेसच्या ट्रोजन डिमेलोंची मागणी
Goa TMC Trojan demello
Goa TMC Trojan demelloDainik Gomantak

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणात सरकारने नेमलेले विशेष तपास पथक (एसआयटी) ‘त्या’ मंत्र्याच्या अगदी जवळ पोहोचल्याने त्याने सीबीआय आणि ईडीकडून तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेच काँग्रेसच्‍या माजी प्रदेशाध्यक्षांनी त्‍याचे स्वागत केले होते. त्यातून दोघांचे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे, असा आरोप गोवा तृणमूल काँग्रेसच्या संवाद विभागाचे समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी आणण्यात यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिमेलो बोलत होते. राज्यात सध्या प्रत्‍येक विषयावरून राजकारण सुरू आहे. राज्‍य मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष हे प्रथम एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात आणि नंतर पाठराखण. त्यामुळे हा केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे, असे डिमेलो म्‍हणाले.

त्‍या मंत्र्याच्या विधानावरून स्‍पष्‍ट होत आहे की मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली असलेल्या एसआयटीवर त्यांचा विश्‍वास नाही. केंद्रीय देखरेख करणाऱ्या तपास पथकांवर त्याचा अधिक विश्‍वास आहे. कारण देशातील एकाही सरकारी तपास संस्थेने आजपर्यंत भाजपच्या एकाही मंत्र्याला दोषी ठरविलेले नाही. त्यांनी नेहमीच विरोधी पक्षांतील नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यासाठीच या मंत्र्याने ही मागणी केली आहे, असा दावा तृणमूल काँग्रेस नेते डिमेलो यांनी केला.
या पत्रकार परिषदेला ॲना ग्रासियस आणि जयेश शेटगावकर यांचीही उपस्थिती होती.

Goa TMC Trojan demello
Illegal Hill Cutting : अवैध डोंगरकापणीकडे हडफडे पंचायतीचे दुर्लक्ष

‘तो’ दावा ठरला खरा!
सदर मंत्र्याने काँग्रेस पक्षाच्या माजी अध्याक्षांना ‘दलाल’ म्हटले आहे. परंतु त्‍याने निवडणुकीपूर्वी याच व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. त्याच्या प्रवेशाला पर्वरी काँग्रेस गट समितीने जोरदार विरोध करून राजीनामाही दिला होता. माजी पर्वरी गटाध्यक्ष फडते यांनी दावा केला होता की, हाच भू-माफिया निवडणुकीनंतर सर्वांत श्रीमंत राजकारणी होणार, जो आता खरा ठरला आहे, असा निशाणा ट्रोजन डिमेलो यांनी साधला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com