Elon Musk Latest News Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

Apple lawsuit Elon Musk: मस्क यांनी ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘अॅपल’ वापरणाऱ्या ‘यूझर’ला काही ‘अॅप’ची शिफारस केली जाते. मात्र, त्यामध्ये ‘एक्स’ आणि ‘ग्रोक एआय चॅटबॉट’चा समावेश नाही.

Sameer Panditrao

न्यूयॉर्क: ‘अॅपल’ कंपनीकडून ‘एक्स’ आणि ‘ग्रोक एआय चॅटबॉट अॅप’ यांना शिफारस केलेल्या ‘अॅप’मध्ये समाविष्ट न केल्याबद्दल उद्योजक आणि ‘स्पेस एक्स’चे प्रमुख एलॉन मस्क ‘अॅपल’ कंपनीविरोधात दावा दाखल करणार आहेत.

मस्क यांनी ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘अॅपल’ वापरणाऱ्या ‘यूझर’ला काही ‘अॅप’ची शिफारस केली जाते. मात्र, त्यामध्ये ‘एक्स’ आणि ‘ग्रोक एआय चॅटबॉट’चा समावेश नाही. याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची आवश्यक आहे. विशिष्ट कंपन्यांनाच ‘अॅपल’कडून झुकते माप दिले जात आहे.

एलन मस्क यांनी या मुद्द्यावरून ‘अॅपल’वर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘अॅपल’च्या ‘अॅप स्टोअर’ धोरणामुळे ‘ओपन एआय’व्यतिरिक्त इतर कोणत्याही ‘एआय’ कंपनीला पहिली रँक मिळणे अशक्य झाले आहे. ही स्पष्टपणे मक्तेदारी आहे. त्यामुळे, मस्क यांच्या कंपनीने ‘अॅपल’विरुद्ध लगेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही दंड

युरोपीय महासंघामधील २७ देशांच्या नियामकांनी एप्रिलमध्ये ‘अॅप स्टोअर’मध्ये नसलेल्या अन्य पर्यायांकडे जाण्यापासून यूझरना रोखल्याप्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ‘अॅपल’ला ५० कोटी युरोचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी, महासंघाने अन्य एका प्रकरणात ‘अॅपल’ला दोन अब्ज अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावला होता. ‘अॅपल म्युझिक स्टोअर’ला प्राधान्य देऊन ‘स्पॉटिफाय’सारख्या इतर ‘अॅप’साठी ‘यूझर’नी कसे पैसे द्यावेत, हे सांगण्यास मनाई केली होती. त्याबद्दल हा दंड ठोठविण्यात आला होता.

मस्क यांचा आक्षेप

‘अॅपल’च्या ‘अॅप स्टोअर’मध्ये ‘चॅट जीपीटी’ला प्राधान्य दिले जाते. ‘ग्रोक’ किंवा इतर ‘एआय अॅप’ची शिफारस केली जात नाही.

यामुळे ग्राहकांच्या निवडीवर परिणाम होतो आणि विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी राहते.

‘अॅपल’ने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत अॅपलवर अनेकदा ‘अँटीट्रस्ट’ उल्लंघनाचे आरोप झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT