Manish Jadhav
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नाव बदलून 'केकियस मॅक्सिमस' (Kekius Maximus) असे केले आहे. ज्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
Kekius Maximus हे नाव प्रत्यक्षात इंटरनेट संस्कृती आणि memes द्वारे प्रेरित आहे. हे नाव दोन भिन्न-भिन्न संदर्भ जोडते.
पेपे द फ्रॉग, हे एक लोकप्रिय इंटरनेट मीम आहे, जे विनोद आणि व्यंग्यांचे प्रतीक आहे. तर दुसरे ग्लॅडिएटर चित्रपटातील मॅक्सिमस पात्र, जे शक्ती आणि प्रभावाचे प्रतीक आहे. यासोबतच त्याच नावावर आधारित क्रिप्टो टोकन 'KEKIUS' देखील आहे, जे इथरियम आणि सोलाना सारख्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर चालते.
मस्क यांनी नाव बदलल्यानंतर KEKIUS टोकनच्या किंमतीत मोठी वाढ झाली. रिपोर्टनुसार, मस्क यांनी नाव बदलल्यानंतर काही तासांतच केकियस टोकनची व्हॅल्यू गगनाला भिडली. आत्तापर्यंत किंमत 500 टक्क्यांनी वाढली.
मस्क यांना क्रिप्टो मार्केटमधील मोठ्या बदलांचे श्रेय दिले जाते. त्यांच्या ट्विट्स आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजने डोगेकॉइन सारख्या मीम्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रसिद्धीच्या झोतात आणले. KEKIUS च्या बाबतीतही त्यांच्या नव्या ओळखीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.