Apple Event 2021 Dainik Gomantak
ग्लोबल

Apple Event 2021: 'दम मारो दम' गाण्यावरून सोशल मिडीयावर उन्माद

Apple Event 2021: जगातील मोबाईल प्रेमींचे आयफोन प्रेम लपले नाही.

Priyanka Deshmukh

ॲपलचा इव्हेंट (Apple Event 2021) व्हावा आणि तो चर्चेत न यावा हे होणे अशक्यच. यावेळी आयफोन 13 सह इतर उत्पादने लाँच करताना देखील हा इव्हेंट भारतीयांसाठी खूप खास होता. येथे, कंपनीचे सीईओ टीम कुक (CEO Tim Cook) स्टेजवर आल्यानंतर, एक धून वाजवली गेली, जी बॉलिवूडचं हिट गाण दम मारो दमने प्रेरित होती. एवढेच नाही तर ॲपलने आपल्या प्रोमो व्हिडीओमध्येही ही ट्यून वापरली आहे. सोशल मीडिया वापरकर्ते देखील याबाबत अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

जगातील मोबाईल प्रेमींचे आयफोन प्रेम लपले नाही. भारतातील नवीन तंत्रज्ञान आणि नविन स्मार्टफोन उत्साही लोकं या मेगा इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा ॲपलने आयफोन 13 ची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यासाठी 'दम मारो दम' या गाण्याची ट्यून वापरली तेव्हा लोक अक्षरश: वेडे झाले. मग काय सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.

कॅलिफोर्नियास्थित तंत्रज्ञान दिग्गजाने मंगळवारी रात्री आयफोनचे नवीन प्रकार आणि इतर उपकरणे लॉन्च केली. त्यानंतर न्यूयॉर्क ट्रेडिंगमध्ये ॲपलचा स्टॉक 1% घसरून $ 148.12 वर बंद झाला, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे.

"हा आम्ही तयार केलेला सर्वोत्तम आयफोन आहे. लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी अत्यंत उत्तम उत्पादने आणि सेवांची रचना करण्यासाठी ॲपल आपले कार्य लक्षात घेऊन काम करत आहे," असे ," कुक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT