John Mcafee Dainik Gomantak
ग्लोबल

John Mcafee: अँटीव्हायरस गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन मॅकॅफीने यामुळे केली आत्महत्या

John Mcafee: जगभरात 'अँटीव्हायरस गुरु' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन मॅकॅफीने बुधवारी तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली.

Manish Jadhav

John Mcafee: जगभरात 'अँटीव्हायरस गुरु' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन मॅकॅफीने बुधवारी तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. जॉन 75 वर्षांचा होता. अमेरिकेला स्पेनमधून प्रत्यार्पण करण्याच्या प्रकरणात निर्णय आल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. मॅकॅफीच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरु असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जॉन मॅकॅफी कोण होता?

दरम्यान, त्याचे पूर्ण नाव जॉन डेव्हिड मॅकॅफी होते. तो एक ब्रिटिश-अमेरिकन कम्प्यूटर प्रोग्रामर आणि व्यापारी होता. त्याचा जन्म 18 सप्टेंबर 1945 रोजी सिंडरफोर्ड, युनायटेड किंगडम येथे झाला होता. त्याने 1987 मध्ये McAfee Associates ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली होती. त्याने ती 1994 पर्यंत चालवली. मात्र, 2011 मध्ये ही कंपनी इंटेलने विकत घेतली. तथापि, या कंपनीमध्ये मॅकॅफी ब्रँडचे नाव अजूनही सुरु आहे.

दुसरीकडे, 1987 मध्ये जगातील पहिली व्यावसायिक अँटी-व्हायरस कंपनी स्थापन करण्यापूर्वी, McAfee ने NASA, Xerox आणि Lockheed Martin सारख्या कंपन्यांमध्ये काम केले. मॅकॅफी हा राजकीय कार्यकर्ताही होता. तो क्रिप्टोकरन्सी प्रवर्तकही होता. अहवालानुसार, 1980 च्या दशकात नावारुपास आल्यानंतर तो क्रिप्टोकरन्सी प्रमोटर बनला होता, जो दिवसाला $2,000 कमावण्याचा दावा करत होता. त्यानंतर ड्रग्ज, शस्त्रे आणि खुनाशी संबंधित वादांमुळे तो चर्चेत राहिला.

जॉन मॅकॅफीवर कोणते आरोप होते?

दुसरीकडे, ऑक्टोबर 2020 मध्ये बार्सिलोना विमानतळावर अटक झाल्यापासून मॅकॅफी स्पेनच्या तुरुंगात बंद होता. इस्तंबूलला जाण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर करचुकवेगिरीचा आरोप होता. त्याच्यावर 2014 ते 2018 दरम्यान आयकर रिटर्न न भरल्याचा आरोप होता.

जीवन संपवले

75 वर्षीय जॉन मॅकॅफीने बुधवारी तुरुंगात गळफास लावून घेतला. त्याचे वकील जेवियर व्हिलालबास यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, स्पॅनिश न्यायालयाने जॉन मॅकॅफीचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर मॅकॅफीने हे पाऊल उचलले. करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जॉनकडे न्यायालयाच्या निर्णयांविरुद्ध अपील करण्याचा पर्याय होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT