Scott Morrison & Anthony Albanese Dainik Gomantak
ग्लोबल

स्कॉट मॉरिसन युगाचा अस्त, अँथनी अल्बानीज होणार ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान

ऑस्ट्रेलियात (Australia) जवळपास एक दशक सरकार चालवणारे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियात जवळपास एक दशक सरकार चालवणारे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. अशा प्रकारे लेबर पार्टीचे नेते अँथनी अल्बानीज हे देशाचे पुढील पंतप्रधान होणार आहेत. अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियन लेबर पार्टीचे नेते आहेत. (Anthony Albanese will be the Prime Minister of Australia)

दरम्यान, स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनीही लिबरल पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाचे (Australia) नेतेपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता नवीन विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे. स्कॉट मॉरिसन हे एक दशकाहून अधिक काळ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते. मात्र, देशात अल्पमतातील सरकार (Government) स्थापन होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, प्रत्यक्षात लाखो मतांची मोजणी अद्याप झालेली नाही. असे असूनही, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अमेरिका, जपान आणि भारतातील नेत्यांसह टोकियोमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेला मॉरिसन उपस्थित राहणार आहेत. मॉरिसन म्हणाले, 'मला वाटते की, देशात निश्चितता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाचा विकास होणे क्रमप्राप्त आहे.' ते पुढे म्हणाले, ''विशेषत: या आठवडाभरात ज्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत, त्यामध्ये देशाच्या सरकारची अतिशय स्पष्ट माहिती असणे मला खूप महत्त्वाचे वाटते.'' 2007 नंतर पहिलीच निवडणूक मजूर पक्षाने जिंकली आहे. विरोधी पक्षनेते अँथनी अल्बानीज हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

अँथनी अल्बानीज कोण आहे?

अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान बनणार आहेत. ते ऑस्ट्रेलियन मजूर पक्षाचे नेते आहेत. अल्बानीज 1996 पासून ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे सदस्य आहेत. अशा प्रकारे ते दोन दशकांहून अधिक काळ खासदार आहेत. 2013 मध्ये अल्बानीज यांना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय 2007 ते 2013 दरम्यान ते कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2022 च्या निवडणुकीच्या प्रचारात, त्यांच्या मजूर पक्षाने ऑस्ट्रेलियातील वाढत्या महागाई दरम्यान अधिक आर्थिक मदत आणि मजबूत सामाजिक सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. पक्षाने असेही म्हटले आहे की, 2050 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात 43 टक्के घट करुन हवामान बदलाचा सामना करायचा आहे.

अँथनी अल्बानीज काय म्हणाले?

निवडणुकीतील विजयादरम्यान लेबर पार्टीच्या मुख्यालयात पोहोचताच अल्बनीज यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांनी ऑस्ट्रेलियन जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, 'आज ऑस्ट्रेलियातील जनतेने परिवर्तनासाठी मतदान केले आहे. या विजयाने मी उत्साही आहे आणि मला 31वे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली याचा मला अभिमान वाटतो. मी ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी योग्य अशा सरकारचे नेतृत्व करीन. ऑस्ट्रेलियन लोकांप्रमाणे धाडसी, मेहनती आणि काळजी घेणारे सरकार स्थापन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT