Huge reserves of gold
Huge reserves of gold Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: सौदी अरेबियाची चांदी! इस्लामच्या पवित्र शहर मक्कामध्ये सापडला सोन्याचा मोठा साठा

Manish Jadhav

Saudi Arabia News: मुस्लिम समुदयाचे पवित्र शहर मक्का येथे सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. सौदी अरेबियाने नुकतीच पवित्र मक्का शहरात सोन्याचा प्रचंड मोठा साठा सापडल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात सौदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये सांगितले की, मक्कामधील अल खुर्मा गव्हर्नरेटमध्ये असलेल्या मन्सूरह मसारा सोन्याच्या खाणीच्या दक्षिणेला 100 किमी अंतरावर सोन्याचा साठा सापडला आहे.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या या खाण कंपनीने म्हटले आहे की, या भागात सोन्याचे अनेक साठे सापडले आहेत. या साठ्यांवरुन या भागात खाणकामाला मोठा वाव असल्याचे दिसून येते. माडेनने एक प्रोग्राम लॉन्च केला होता आणि 2022 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी सोन्याच्या शोधासाठी मोहीम सुरु केली होती. सोन्याचा साठा शोधणे हे या कार्यक्रमाचे प्रारंभिक यश मानले जाते. मन्सूरह मसाराजवळ सोन्याचा साठा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, माडेनने 2024 मध्ये त्याच्या आसपासच्या भागात ड्रिलिंगच्या कामाला गती देण्याची योजना आखली आहे.

अनेक ठिकाणी खोदकाम सुरु आहे

माडेन मन्सूरह मसारा खाण तसेच तिथून 25 किमी उत्तरेस, जबल अल-गद्रा आणि बीर अल-तविला येथे ड्रिलिंग ऑपरेशन्स देखील चालवतो. या भागात खोदकाम केल्याने सकारात्मक परिणाम मिळाले असून 125 किलोमीटर अंतरावर सोने उत्खनन केले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सौदी अरेबियामध्ये जागतिक दर्जाचा सोन्याचा पट्टा विकसित होईल. 2023 च्या अखेरीस, मन्सूरह मसाराने अंदाजे 7 दशलक्ष औंस सोन्याचे स्त्रोत आणि प्रति वर्ष 250,000 औंस उत्पादन क्षमता काढण्याची योजना आहे.

सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते?

अंटार्क्टिका वगळता जगात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात सोन्याचा साठा आढळतो. सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. 2022 च्या आकडेवारीनुसार, चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे, जो जागतिक सोन्याच्या उत्पादनाच्या 10% उत्पादन करतो. चीनने 2022 मध्ये 375 टन सोन्याचे उत्पादन केले. चीननंतर सर्वाधिक सोन्याचे उत्पादन रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि घाना या देशांमध्ये होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT