China Taiwan Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

China Taiwan Conflict: अमेरिकेकडून तैवानला 28 हजार कोटींचं मोठ गिफ्ट, ड्रॅगनचा पुन्हा तिळपापड!

China Taiwan news: दुसरीकडे, अमेरिकेच्या या घोषणेवर चीन संतापला असून, अशी कोणतीही मदत जागतिक शांततेसाठी धोकादायक असल्याचे त्याने म्हटले आहे.

Manish Jadhav

China Taiwan Conflict: तैवानच्या मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. सार्वभौम देशाप्रमाणे आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याचे तैवानचे म्हणणे असले तरी चीन तो आपला भाग मानतो. या सर्व परिस्थितीत अमेरिका तैवानच्या समर्थनार्थ उभा आहे.

अलीकडेच, अमेरिकेने 28 हजार कोटींचे लष्करी पॅकेज देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामध्ये शस्त्रास्त्रांपासून प्रशिक्षणापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

दुसरीकडे, अमेरिकेच्या (America) या घोषणेवर चीन संतापला असून, अशी कोणतीही मदत जागतिक शांततेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

मात्र, कोणती शस्त्रे तैवानला देण्यात येणार आहेत हे अद्याप अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही मीडिया हाऊसमधून समोर आलेल्या माहितीनुसार पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम, पिस्तूल आणि रायफल्सचा समावेश आहे.

तैवानला मदतीची गरज आहे

जर कोणी दुसऱ्या सार्वभौम देशामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला मदत करण्याची जबाबदारी प्रत्येक देशाची असली पाहिजे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

अमेरिका आपले कर्तव्य बजावत आहे. पण फक्त तेच आहे का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तैवानला (Taiwan) 28 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेने ही केवळ सुरुवात असल्याचे चीनचे म्हणणे आहे. अशा प्रकारे, अमेरिका हळूहळू तैवानमध्ये हस्तक्षेप वाढवेल आणि खरी लढाई त्याच्याशीच होईल.

अमेरिकेने वातावरण खराब करु नये

अमेरिकेतील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिका प्रत्यक्षात तणाव वाढवण्याचे काम करत आहे. अमेरिकेने शस्त्र पुरवठा करु नये.

अमेरिका तैवानला जी शस्त्रे देणार आहे ते त्यांच्या राखीव शस्त्रांमधूनच दिली जातील. याचा अर्थ तैवानला लवकरच शस्त्रे मिळतील. या संदर्भात अमेरिकेच्या सिनेटनेही अध्यक्ष जो बायडन यांना अधिकार दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT