American health experts advise India about Omicron variant Dainik Gomantak
ग्लोबल

Omicron variant बद्दल भारताला अमेरिकन आरोग्य तज्ञांचा सल्ला

वॉशिंग्टन विद्यापिठाचे आरोग्य तज्ञ डॉ. क्रिस्टोफर मरे यांनी सांगितले की, पुढच्या महिन्यांपर्यंत भारतात दररोज ओमिक्रॉन (Omicron) विषाणुचे सुमारे 5 लाख केसची नोंद केली जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

भारतात ओमिक्रॉन विषाणू (Omicron variant ) दिवसेदिवस वाढत चालला आहे. दरम्यान अमेरिकेच्या एक आरोग्य तज्ञाने दावा केला आहे की पुढील महिन्यापर्यंत भारतात ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग अधिक वाढू शकतो. एका अमेरिकन (America) तज्ञाचा असा अंदाज आहे की भारतात दररोज 5 लाखांपर्यंत ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद केली जावू शकते.

डॉ. क्रिस्टोफर मरे, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHEM) चे संचालक आणि वॉशिंग्टन विद्यापिठातील हेल्थ मेट्रिक्स सायन्सचे अध्यक्ष म्हणाले की जगभरातील अनेक देश ओमिक्रॉन विषाणुमुळे हैराण झाले आहेत. भारतातील डेल्टा (Delta variant) व्हेरियंटच्या तेजीच्या वेळी आलेल्या विषाणूपेक्षा यावेळी ओमिक्रॉन विषाणुच्या संसर्गामुळे जास्त केसेस समोर येत आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की यावेळी देशात ओमिक्रॉन विषाणुची (Omicron variant) तीव्रता डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी असेल.

वॉशिंग्टन विद्यापिठाचे आरोग्य तज्ञ डॉ. क्रिस्टोफर मरे यांनी सांगितले की, पुढच्या महिन्यांपर्यंत भारतात दररोज ओमिक्रॉन (Omicron) विषाणुचे सुमारे 5 लाख केसची नोंद केली जाऊ शकते. आमच्याकडे सध्या मॉडेल आहे जे आम्ही नंतर प्रसिद्ध करू. भारतातील अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की देशात हायब्रिड प्रतिकारशक्ती आहे,ज्यामुळे ओमिक्रॉन विषाणुचा कमी प्रभाव होईल. डॉ क्रिस्टोफर मरे म्हणाले की लसीकरण गंभीर आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून लक्षणीय संरक्षण प्रदान करते. हेच कारण आहे की आम्हाला वाटते की भारतात ओमिक्रॉनची अनेक केसेस असतील परंतु डेल्टापेक्षा कमी रुग्णालयात दाखल आणि मृत्यू होतील.

अमेरिकन आरोग्य तज्ञ डॉ. क्रिस्टोफर मारे पुढे म्हणाले की आम्हाला अपेक्षा आहे की संसर्गाच्या 85.2 टक्के केसेसमध्ये कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत. म्युटेशनबद्दल सांगायचे झाले तर प्रसार जीतका जास्त तितके म्युटेशन होण्याची शक्यता असते. भारतात दररोज एक लाखाहून अधिक केसेस समोर येत आहेत. देशात आतापर्यंत एकूण 4,83,178 लोकांचा या जीवघेण्या विषामूळेमृत्यू झाला आहे. दरम्यान देशात लसीकरणही वेगाने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT