Antony Blinken  Dainik Gomantak
ग्लोबल

'हिंदू राष्ट्रवाद'च्या मुद्द्यावर अमेरिकेने केले भाष्य! पीएम मोदींबद्दल म्हणाले...

World Economic Forum: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Manish Jadhav

American Foreign Minister Antony Blinken: दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका या मुद्द्यांवर भारताशी सातत्याने बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे यश मिळवले आहे, ही एक विलक्षण यशोगाथा आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात, 'जलद गतीने वाढणारा हिंदू राष्ट्रवाद' या मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती, ज्याला उत्तर देताना ब्लिंकन म्हणाले की, 'भारत आणि अमेरिका या मुद्द्यावर राजनैतिक पातळीवर सतत आणि नियमितपणे बोलत आहेत. याशिवाय लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दाही आमच्या चर्चेत समाविष्ट आहे.'

ब्लिंकन पुढे म्हणाले की, ''जेव्हा जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मानवी हक्क आणि लोकशाहीच्या मूलभूत समस्यांना अग्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. या समस्या आम्ही वेगवेगळ्या देशांसमोर वेगवेगळ्या प्रकारे मांडत आलो आहोत. काही देशांसोबत अशी चर्चा अधिक बोलकी आहे. त्याचवेळी, काही देशांसोबतच्या आमच्या संबंधांचे स्वरुप लक्षात घेता, खुलेपणाने चर्चा केली जाते ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. हीच स्थिती भारताबाबतही आहे.''

भारताच्या कामगिरीचे कौतुक केले

ब्लिंकन यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीचेही कौतुक केले आणि सांगितले की, भारताची कामगिरी ही एक विलक्षण यशोगाथा आहे.

भारताच्या आर्थिक विकासाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलेले विलक्षण यश आपण पाहत आहोत.' भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख अविरत काम करत आहेत, असेही ब्लिंकन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. दोन्ही देशांमधील संबंधांवर विश्वास ठेवणारे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन या दोघांच्याही मेहनतीचे हे फळ आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT