Silicon Valley Bank Dainik Gomantak
ग्लोबल

Silicon Valley Bank: अमेरिकेतील सर्वात मोठी बँक दिवाळखोर

ठेवीदारांकडून 42 अब्ज डॉलर काढण्याचा प्रयत्न

Akshay Nirmale

Silicon Valley Bank: एक दशकाहून अधिक काळ अमेरिकेतील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर झाली आहे. बँक दिवाळखोर होण्याच्या एक दिवस आधी, गुरुवारी गुंतवणूकदार आणि ठेवीदारांनी बँकेतून सुमारे 42 अब्ज डॉलर रूपये काढण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने ही बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

9 मार्च रोजी बँकेकडे 958 दशलक्ष डॉलरची निगेटिव्ह कॅश बॅलन्स होता. ठेवीदारांकडून पैसे काढण्याच्या प्रयत्नाचे प्रमाण इतके मोठे होते की बँकेकडे रोख रक्कम आणि ते मिळविण्याच्या पद्धती संपल्या.

सिलिकॉन व्हॅली बँकेचे सीईओ ग्रेग बेकर यांनी बुधवारी शेअरधारकांना पत्र पाठवले. त्यानंतर बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. बँकेचे चलन संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

सिलिकॉन व्हॅली बँकेचे मुख्य कार्यालय आणि इतर सर्व शाखा 13 मार्चला पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच, सर्व विमाधारक ठेवीदारांना सोमवार सकाळपर्यंत त्यांच्या ठेवी काढता येतील. 31 डिसेंबर 2022 पर्यंत, सिलिकॉन व्हॅली बँकेची एकूण मालमत्ता सुमारे 209 अब्ज डॉलर होती आणि एकूण ठेवी सुमारे 175.4 अब्ज डॉलर इतक्या होत्या.

विशेष म्हणजे, गेल्या अडीच वर्षांत FDIC विमाधारक बँक बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये अल्मेना स्टेट बँकेलाही टाळे ठोकण्यात आले होते.

याआधी अमेरिकेतील बँकिंग संकटाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात मोठी समस्या 2008 साली आली होती. त्या वर्षी बँकिंग फर्म लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. यानंतर अमेरिकेसह जगभरातील मंदीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT