2046 मध्ये व्हॅलेंटाईन डेला एक लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो, असा इशारा नासाने दिला आहे. नासा या लघुग्रहावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. लघुग्रह धडकण्याची शक्यता कमी असली तरी, तो धोक्याचे कारण बनू शकतो.
नासाचे शास्त्रज्ञ लघुग्रहावर लक्ष ठेऊन आहेत. या लघुग्रहाला 2023DW म्हणून ओळखले जाते. 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा लघुग्रहाचा शोध लागला.
सीबीएस न्यूजच्या माहितीनुसार, नासाने या लघुग्रहाचा जोखमीच्या यादीत समावेश केला आहे. 2023DW लघुग्रहाला जोखीमीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.
NASA ने याबाबत ट्विट केले आहे. 'आम्ही 2023 DW नावाच्या एका नवीन लघुग्रहाचा मागोवा घेत आहोत. 2046 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची फार कमी शक्यता आहे. बर्याचदा जेव्हा नवीन वस्तू पहिल्यांदा शोधल्या जातात तेव्हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्या कक्षाचा पुरेसा अंदाज लावण्यासाठी अनेक आठवड्यांचा डेटा लागतो. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसचे म्हणणे आहे की अद्याप याबाबत खूपच कमी माहिती आहे.
सीएनएनच्या मते, जेव्हा एखादा लघुग्रह शोधला जातो तेव्हा तो सुरुवातीला अधिक धोकादायक मानला जातो. मात्र, जेव्हा या नवीन लघुग्रहाचे अधिक विश्लेषण केले जाते, तेव्हा धोक्याची शक्यता कमी होते. नासाच्या जोखीम यादीमध्ये 1448 लघुग्रह आहेत आणि त्यात 2023 DW चा धोका सर्वाधिक आहे.
हा लघुग्रह पुढील दोन दशकांपर्यंत पृथ्वीच्या दिशेने येणार नाही. हा लघुग्रह 160 फूट आहे. लघुग्रह 2023 DW सूर्याभोवती फिरत आहे. नासाच्या माहितीनुसार, 2047 ते 2054 या कालावधीत 9 इतर लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतील. हा लघुग्रह 2 फेब्रुवारीला पहिल्यांदा अंतराळात दिसला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.