America Sanctioned Israeli Group Tsav 9: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक घनघोर होत चालले आहे. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांना लक्ष्य करत आहे. इस्त्रायलने नुकताच राफाह शहरावर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्याप्रमाणात लोक मारले गेले. या हल्ल्यानंतर जगभरातून इस्त्रायलवर टीकेची झोड उठवली. ‘All Eyes on Rafah’ अशाप्रकारचे कॅम्पेन सोशल मीडियावर चालवण्यात आले. मात्र याचा इस्त्रायलवर काहीही फरक पडल्याचे दिसत नाहिये.
दरम्यान, राफाहमधील इस्रायलच्या नियंत्रणानंतर जगभरातून येणारी मानवतावादी मदत आता इस्रायलच्या क्रॉसिंगवर अवलंबून आहे. इस्रायलमधील अनेक उजव्या विचारसरणीचे गट गाझामध्ये मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला लक्ष्य करत आहेत. यूएनने अनेक वेळा इशारा दिला की, गाझामधील हजारो लोक उपासमारीच्या मार्गावर आहेत. त्यांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे. मात्र आता, गाझाला जाणाऱ्या मानवतावादी मदतीमध्ये अडथळा आणणाऱ्या गटांवर कठोर भूमिका घेत अमेरिकेने TSAV9 या इस्रायली संघटनेवर बंदी घातली. ही हिंसक, अतिरेकी इस्त्रायली संघटना आहे.
TSAV9 ने गाझामध्ये मदत काफिले थांबवले आणि ट्रकवर हल्ला केला. अमेरिकेने म्हटले की, TSAV9 च्या कार्यकर्त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला केरेम शालोम क्रॉसिंगवर व्यत्यय आणला. त्यानंतर त्यांनी ट्रक्सना आग लावली होती. याशिवाय, अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने असेही म्हटले की, या गटाने त्यांच्या हल्ल्यांमध्ये ड्रायव्हर्स आणि इस्रायली संरक्षण दलांना देखील जखमी केले आहे.
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी एका निवेदनात म्हटले की, “ गेल्या काही महिन्यांपासून TSAV9 चे सदस्य गाझापर्यंत मानवतावादी पोहोचू देत नाहीयेत. ते रस्ते अडवत आहेत. एवढेच नाहीतर ताफ्यावर हिंसक हल्ला करत आहेत. मे महिन्यात मानवतावादी मदत घेऊन चाललेल्या काफिल्यावर हल्ला केल्याबद्दल मिलर म्हणाले की, ‘’TSAV9 च्या सदस्यांनी वेस्ट बँकमधील हेब्रॉनजवळ गाझाला मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला आग लावली.’’ TSAV च्या या कृतींमुळेच अमेरिकेने आता त्यांच्यावर बंदी घातली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.