Amercia Nigeria Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

Nigeria Airstrike: "ख्रिश्चनांची कत्तल थांबवा, अन्यथा याद राखा!" ख्रिसमसच्या रात्री अमेरिकेचा नायजेरियात ISIS वर मोठा प्रहार; ट्रम्प कडाडले VIDEO

Amercia Nigeria Airstrike: जगाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असतानाच अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध एक मोठी मोहीम राबवली.

Manish Jadhav

Amercia Nigeria Airstrike: जगाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असतानाच अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध एक मोठी मोहीम राबवली. अमेरिकेने नायजेरियावर हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिसमसच्या (25 डिसेंबर) रात्री नायजेरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भीषण हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. या कारवाईची माहिती स्वतः ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली असून, नायजेरियातील ख्रिश्चन समुदायाचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नायजेरिया सरकार अपयशी, अमेरिकेचा हस्तक्षेप

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या पोस्टमध्ये नायजेरिया सरकारवर ताशेरे ओढले. "नायजेरियातील सरकार हिंसाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर अमेरिकेने आता हस्तक्षेप केला नसता, तर नायजेरियातील ख्रिश्चन समुदायाचे अस्तित्व धोक्यात आले असते," असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी दावा केला की, हे दहशतवादी प्रामुख्याने निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करत आहेत.

ट्रम्प यांचा प्रहार

दहशतवाद्यांविरुद्ध नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या ट्रम्प यांनी ISIS च्या दहशतवाद्यांचा उल्लेख 'दहशतवादी कचरा' (Terrorist Scum) असा केला. ते म्हणाले की, हा गट गेल्या काही काळापासून निष्पाप लोकांची हत्या करत आहे. अमेरिकन लष्कराने या मोहिमेत अत्यंत 'अचूक आणि परफेक्ट' स्ट्राईक केल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "अमेरिका कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला कधीही खतपाणी घालणार नाही किंवा तो वाढू देणार नाही. सर्वांना ख्रिसमच्या शुभेच्छा, अगदी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनाही! पण लक्षात ठेवा, जर ख्रिश्चनांच्या हत्या सुरुच राहिल्या, तर भविष्यात आणखी बरेच दहशतवादी मारले जातील."

नायजेरियातील धार्मिक हिंसाचाराचा भयावह चेहरा

'इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिव्हिल लिबर्टीज अँड द रुल ऑफ लॉ' (Intersociety) च्या एका ताज्या अहवालानुसार, नायजेरियात धार्मिक हिंसाचाराने भीषण रुप धारण केले आहे. या वर्षात 1 जानेवारी ते 10 ऑगस्ट दरम्यान नायजेरियात 7000 पेक्षा जास्त ख्रिश्चनांची हत्या करण्यात आली आहे. या कत्तलींमागे बोको हराम, फुलानी अतिरेकी आणि ISIS सारख्या संघटनांचा हात असल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा उल्लेख 'डिपार्टमेंट ऑफ वॉर' असा करत आपल्या सैन्याचे कौतुक केले. "अशी अचूक आणि प्रभावी कारवाई करण्याची ताकद फक्त अमेरिकेच्या लष्करामध्येच आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

नायजेरिया सरकारचे अधिकृत स्पष्टीकरण

या हवाई हल्ल्यानंतर नायजेरिया (Nigeria) सरकारनेही आपले अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. "आम्ही दहशतवाद आणि हिंसक उग्रवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत गुप्तचर माहिती आणि सुरक्षा सहकार्य करत आहोत. याच सहकार्याचा भाग म्हणून उत्तर-पश्चिम नायजेरियातील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले आहेत," असे नायजेरियाने म्हटले. दुसरीकडे मात्र, या कारवाईमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आलेली आक्रमकता पुन्हा एकदा जगाने अनुभवली आहे.

नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री युसूफ मैतामा तुग्गर यांनी बीबीसीला सांगितले की ही "दहशतवाद्यांना लक्ष्य करणारी" "संयुक्त कारवाई" होती आणि त्याचा "विशिष्ट धर्माशी काहीही संबंध नाही".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT