B61 13 Nuclear Bomb Dainik Gomantak
ग्लोबल

'लिटिल बॉय' पेक्षा 24 पट जास्त धोकादायक... अमेरिका बनवणार सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब

B61 13 Nuclear Bomb: अमेरिका आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे.

Manish Jadhav

B61 13 Nuclear Bomb: अमेरिका आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे. जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा हा 24 पट अधिक शक्तिशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव B61-13 आहे. हे B61 फॅमिलीतील 13 वे व्हेरिएंट असेल.

विशेष म्हणजे, हा ग्रॅव्हिटी बॉम्ब असेल. म्हणजे या प्रकारचा बॉम्ब थेट लक्ष्यावर टाकला जातो. मात्र, कोणत्याही क्षेपणास्त्रातून लॉन्च केला जाऊ शकत नाही. B61-13 बनवण्याचे काम नॅशनल न्यूक्लियर सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशन (NNSA) च्या देखरेखीखाली केले जाईल.

दरम्यान, अमेरिकेने (America) ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा चीनने अलीकडेच 2030 पर्यंत अण्वस्त्र शस्त्रे दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रशियाही अण्वस्त्रांच्या चाचणीवर बंदी घालणाऱ्या करारातून बाहेर पडला आहे.

B61-13 B61-7 सारखा दिसेल. पण त्यात सुरक्षा आणि कंट्रोल फीचर्स अधिक चांगले असतील. यात अपग्रेडेड टेल किट देखील असेल, ज्यामुळे ते थेट लक्ष्यावर आघात करण्यास मदत करेल.

B61-13 'लिटल बॉय' पेक्षा किती धोकादायक असेल?

दुसऱ्या महायुद्धात 1945 मध्ये हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बला 'लिटल बॉय' असे नाव देण्यात आले होते. हिरोशिमावर हा बॉम्ब पडला तेव्हा तेथील लोकसंख्या 3.20 लाख होती. 1945 च्या अखेरीस या बॉम्बमुळे 1.40 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

लिटल बॉयचे वजन 9,700 पौंड होते, तर त्याचा व्यास 28 इंच होता. त्यात 141 पौंड युरेनियम होते. तर B61-13 मध्ये प्लुटोनियम असेल. त्याचे वजन 360 किलोटन असेल. त्याचा व्यास 13.3 इंच असेल.

B61-13 मुळे किती विनाश होऊ शकतो?

दरम्यान, हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बने 6650 डिग्री सेल्सिअस उष्णता निर्माण केली होती. आता कल्पना करा की, B61-13 यापेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली आहे, तर तो किती उष्णता निर्माण करेल.

जेव्हा B61-13 टाकला जाईल तेव्हा तो खूप मोठे कंपन निर्माण करेल. त्याची आग साडेसहा किलोमीटरच्या त्रिज्येपर्यंत पसरेल. आणि 100 किलोमीटरच्या त्रिज्येतील जमीन पूर्णपणे नष्ट होईल.

दुसरीकडे, मानवाधिकार संघटना वेजिंग पीसचा अंदाज आहे की जेव्हा 300 किलोटन पेक्षा जास्त वजनाचा आण्विक बॉम्ब टाकला जातो तेव्हा फक्त आग किमान 6 तास राहते. त्यामुळे 100 किलोमीटरच्या परिघातील वातावरण खराब होईल.

असा अंदाज आहे की, जेव्हा B61-13 टाकला जाईल तेव्हा काही तासांत 10 लाखांहून अधिक मृत्यू होतील. B61-13 चे टेल किट अशा प्रकारे डिझाइन केले जाईल की, ते त्याची अचूकता वाढवेल.

पण तो का बनवला जात आहे?

शीतयुद्धाच्या काळात, जेव्हा अमेरिका आणि रशिया (Russia) यांच्यात अण्वस्त्रांची शर्यत होती, तेव्हा B61-7 हा अमेरिकन साठ्यातील सर्वात महत्त्वाचा बॉम्ब होता. हे 1980 च्या दशकात हा बॉम्ब तयार करण्यात आला होता. अमेरिकेकडे अजूनही काही B61-7 बॉम्ब आहेत. त्यांचे शेल्फ लाइफ 12 वर्षे आहे.

ओबामा सरकारच्या काळात B61-12 मंजूर करण्यात आले होते. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात महागडा प्रकल्प होता. B61-13 B61-12 पेक्षा मजबूत आणि अधिक शक्तिशाली आहे. यात एक गाइडेड टेल किट आहे.

B61-13 ची एक खास गोष्ट म्हणजे ते हवेतही स्फोट होऊ शकते. तथापि, B61-13 ला अद्याप यूएस संसदेकडून मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच त्यावर काम सुरु होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

ड्रग्जचा आता गोव्याच्या खेडेगावात शिरकाव; बेलारुसच्या महिलेला एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक

Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत, 'इंडिगो' प्रकरणानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण दक्ष

Goa Live Updates: पर्वरीतील एकाची 70 लाखांची फसवणूक, केरळमधील एकाला अटक

SCROLL FOR NEXT