इस्रायलने हमासची तुलना ISIS शी केली, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले- 'जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत तुम्ही...'

Israel-Hamas War: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर इस्रायली नेत्यांना भेटण्यासाठी तेल अवीवमध्ये पोहोचले.
US Secretary of State Anthony Blinken Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
US Secretary of State Anthony Blinken Israeli Prime Minister Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर इस्रायली नेत्यांना भेटण्यासाठी तेल अवीवमध्ये पोहोचले.

ब्लिंकन यांच्या दौऱ्यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले की, 'अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा दौरा अमेरिकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा असल्याचे दर्शवतो.'

गेल्या आठवड्याच्या शेवटी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासची तुलना त्यांनी इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेशी केली. नेत्यान्याहू पुढे म्हणाले की, “जसे इस्लामिक स्टेटला चिरडले गेले, तसेच हमासलाही चिरडले जाईल.”

दरम्यान, अमेरिकेचे (America) परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या इस्रायलच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. ब्लिंकन म्हणाले की, "मी माझ्यासोबत हा संदेश घेऊन आलो आहे की, तुम्ही स्वत:चा बचाव करण्यासाठी पुरेसे बलवान आहात, पण जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत तुम्हाला याची गरज भासणार नाही."

इस्रायलमध्ये हमासने केलेल्या नागरिकांच्या हत्येचा निषेध करताना ब्लिंकन पुढे म्हणाले की, "मुलांची हत्या केली, मृतदेहांची विटंबना केली, तरुणांना जिवंत जाळण्यात आले, महिलांवर (Women) बलात्कार केला गेला, पालकांना त्यांच्या मुलांसमोर मारण्यात आले - हे आपण कसे समजून घेणार? आम्हालाही इस्रायली नागरिकांच्या शौर्याने प्रेरणा मिळाली आहे...''

US Secretary of State Anthony Blinken Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
Israel Hamas War: ट्रम्प यांनी इस्रायलच्या युद्ध तयारीवर प्रश्न केले उपस्थित, नेतन्याहू हमासवरील हल्ल्यासाठी...

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आज सकाळी अधिकाऱ्यांच्या टीमसह तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते इस्रायल दौऱ्यावर आले आहेत.

अमेरिका सोडण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ब्लिंकन म्हणाले होते की, ''तुम्हाला माहिती आहेच की, मी इस्रायलला जात आहे. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा स्पष्ट संदेश घेऊन निघत आहे. आमचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे..."

US Secretary of State Anthony Blinken Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: 'मुलांच्या फोनमधून TikTok, Instagram अनइंस्टॉल करा', ज्यूइश शाळांकडून पालकांना आवाहन

तर 22 अमेरिकन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे

यापूर्वी, यूएस व्हाईट हाऊसने म्हटले होते की, इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यात सुमारे 22 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, हमासने ओलिस ठेवलेल्यांमध्ये आणखी काही अमेरिकन असू शकतात. ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका इस्रायलशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी अमेरिकेने या हल्ल्यात 14 अमेरिकनांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. "आज आम्हाला आणखी किती अमेरिकन बेपत्ता आहेत याची थोडीशी कल्पना आली आहे," असेही सुलिव्हन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्हाला माहित आहे की, त्यापैकी बरेच अमेरिकन सध्या हमासने ओलिस ठेवले आहेत. मला वाटते की, ही संख्या आणखी वाढू शकते आणि या शक्यतेसाठी आपण सर्वांनी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.” असेही सुलिव्हन म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com