अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान (Taliban) सरकारचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) यांनी अमेरिकेवर (USA) जोरदार टीका केली आहे. अफगाणिस्तानातील बँकिंग मालमत्ता गोठवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर त्यांनी अमेरिकेला सुनावले आहे त्याचबरोबर या सगळ्यावर जग कसे सहन करत आहे असा प्रशन देखील उपस्थित केला आहे. अफगाणिस्तानमध्ये आर्थिक संकट वाढत असताना जग शांत आहे, असेही ते म्हणाले. काबूलमध्ये (Kabul) पत्रकारांशी बोलताना बरादार म्हणाले की, अफगाणिस्तानातील आर्थिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आर्थिक आव्हाने आम्हाला सतत जाणवत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. (America need to support Afghan people says Taliban deputy PM Mullah Abdul Ghani Baradar)
अमेरिकेचे अफगाणिस्तानशी जसे संबंध जगातील इतर देशांसोबत आहेत तेच संबंध असले पाहिजेत, असे बरादार म्हणाले. ते म्हणाले, 'अमेरिकेला अफगाणिस्तानमधून परत जाण्याचा राग आहे मात्र इथे जे लोक अमेरिकेचे मित्र होते, त्यांना आर्थिक समस्या निर्माण करायच्या आहेत.तो पैसा सरकारी अधिकाऱ्यांचा नसून अफगाणिस्तानातील लोकांचा आहे हे जग अमेरिकेला का सांगत नाही? आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. जेव्हा देशात आर्थिक समस्या वाढतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ एका देशावरच होत नाही तर इतर देशांवरही होतो.
बरादार पुढे म्हणाले की, 'अमेरिका जगाला जशी वागणूक देते तशीच अफगाणिस्तानच्या लोकांशी आणि सरकारशीही वागावे ही आमची एकच मागणी आहे.' व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांच्या त्या वक्तव्याला उत्तर देताना बरादार यांनी ही माहिती दिली. त्यानंतर साकी यांनी सोमवारी सांगितले की अफगाणिस्तानला निधी देण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. साकी म्हणाले, 'अनेक कारणांमुळे रक्कम अद्याप होल्डवर आहे.'अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे येथे मालाचे भाव वाढले आहेत.
तालिबानच्या जग आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या राजकीय समस्यांची किंमत अफगाणिस्तानातील जनता चुकवत असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्ते टॉरपेके मोमोंड म्हणाले, "देशांनी मानवतावादी समर्थन राजकारणापासून वेगळे केले पाहिजे." दुर्दैवाने आपण राजकारण्यांच्या राजकारणाचे बळी झालो आहोत, परकीयांच्या राजकारणाचे बळी आहोत.जनतेची बाजू सोडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.