USA DainikGomantak
ग्लोबल

America: अमेरिकेने केली धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांची यादी जाहीर

America: या यादीमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या जवळजवळ 12 देशांचा समावेश आहे

दैनिक गोमन्तक

America:अमेरिकेने ( USA ) धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गंभीर उल्लंघन करणाऱ्या जवळजवळ 12 देशांचा समावेश आहे.यामध्ये म्यानमार, चीन (China ), क्यूबा, एरिट्रिया, इरान, निकारागुआ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान अशा देशांचा समावेश आहे.

त्याचबरोबर,अल्जेरिया,मध्य अफ्रिका गणराज्य,कोमोरोस आणि व्हिएतनाम या देशांचा विशेष लक्षवेधी यादीमध्ये समावेश केला आहे. अमेरिकेने अल-शबाब, बोको हराम, हयात तहरीर अल-शाम, हौथिस, आईएसआईएस-ग्रेटर सहारा, आईएसआईएस-वेस्ट अफ्रिका, जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमिन, तालिबान ( Taliban ) आणि वैगनर संघ या देशांचेदेखील नामांकन केले आहे.

धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांची यादी जाहीर करुन राष्ट्रीय सुरक्षा आणि जगभरातल्या मानवधिकारांचे संरक्षण करण्याच्या आमच्या मुल्यांचे संरक्षण करत आहोत, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे. जे देश धार्मिक स्वातंत्र्य आणि इतर मानवाधिकारांचे संरक्षण करतात ते संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थिर, समृद्ध आणि अधिक विश्वासार्ह भागिदार आहेत असेही ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

ब्लिंकन यांनी पुढे म्हटले आहे कि, अमेरिका जगभरातल्या प्रत्येक देशातल्या धार्मिक स्वातंत्र्यावर सावधानपुर्वक देखरेख करेल आणि त्यासाठी लढणाऱ्या गटाची मदत करेल.तसेच, अमेरिका या विषयावर जगभरातल्या देशांसोबत मिळून काम करेल आणि या यादीमधून बाहेर निघण्यासाठी रुपरेषा तयार करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT