Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

'अमेरिका आता महासत्ता राहिली नाही'

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुमारे 20 वर्षांनंतर तालिबानची राजवट स्थापन झाली आहे. यातच आता ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वालेस (Ben Wallace) यांनी अमेरिकेसाठी हा दारुण पराभव असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुमारे 20 वर्षांनंतर तालिबानची राजवट स्थापन झाली आहे. यातच आता ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वालेस (Ben Wallace) यांनी अमेरिकेसाठी हा दारुण पराभव असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेला (America) यापुढे महासत्ता म्हणता येणार नाही. वॉलेस यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेवर हल्ला केला असून आता यापुढे महासत्ता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. आता हा देश आता फक्त एक मोठी शक्ती बनला आहे. ब्रिटनच्या संरक्षण सचिवांचे हे वक्तव्य अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर टीकेने घेरलेल्या जो बायडन (Joe Biden) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, अफगाणिस्तानातून ब्रिटीश सैन्याची माघार देशाच्या सामर्थ्याशी जोडली जाऊ शकते का, तेव्हा त्यांनी 'होय' असे उत्तर दिले. वॉलेस म्हणाले, 'कारण ब्रिटन महासत्ता नाही, त्यामुळे संकटग्रस्त देश सोडणे नक्कीच आपली मर्यादा दर्शवते.' वॉलेसने अमेरिकेवर उघडपणे टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी तालिबानशी केलेल्या कराराला चूक म्हटले होते. तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमध्ये ब्रिटनची 20 वर्षांची लष्करी मोहीम 29 ऑगस्ट रोजी काबूलमधून उर्वरित ब्रिटिश सैन्याच्या आगमनाने संपुष्टात आली. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केल्यानंतर अनेक प्रमुख शहरे ताब्यात घेतली. अमेरिकेला देश सोडण्याच्या अंतिम मुदतीच्या दोन आठवड्यांपूर्वी हे घडले.

ब्रिटनच्या आधी, रशियाने अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सहभागावर टीका करत म्हटले होते की, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील 20 वर्षांच्या लष्करी उपस्थितीतीत "शून्य" साध्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 1 सप्टेंबर रोजी सांगितले की 20 वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT