Pentagon report on US military losses and damage during the Iran war Dainik Gomantak
ग्लोबल

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

US Iran War Pentagon Audit Report 2026: इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकन लष्कराला अभूतपूर्व आणि अत्यंत भीषण नुकसानाला सामोरे जावे लागले.

Manish Jadhav

US Iran War Pentagon Audit Report 2026: इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकन लष्कराला अभूतपूर्व आणि अत्यंत भीषण नुकसानाला सामोरे जावे लागले. पेंटागनच्या 'डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स इन्स्पेक्टर जनरल'च्या पहिल्या अधिकृत ऑडिट अहवालातून यासंदर्भातील अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली. या अहवालानुसार, 28 फेब्रुवारी ते 30 जून या कालावधीत अमेरिकेने या युद्धात तब्बल 33.4 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 3.21 लाख कोटी गमावले. या कालावधीत 22 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची दारुगोळा आणि शस्त्रसामग्री वापरली गेली असून, अमेरिकेचे अत्याधुनिक फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स आणि शेकडो लष्करी तळ पुरते उद्ध्वस्त झाले आहेत.

अमेरिकन वायुसेनेला या युद्धात मोठा फटका बसला. किमान चार F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट नष्ट झाले, ज्यापैकी तीन मार्चच्या सुरुवातीला कुवेतवर फ्रेंडली फायरचा बळी ठरले, तर एक फायटर जेट इराणमधील थेट लढाईत पाडण्यात आले. याशिवाय अमेरिकेचे सर्वात प्रगत F-35A स्टील्थ फायटर आणि A-10 ग्राउंड-अटॅक विमानासह 7 इंधन भरणारे टँकर्स आणि अत्यंत महागडे E-3 वॉर्निंग एअरक्राफ्ट इराणी हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. सर्वात मोठा हादरा अमेरिकेच्या ड्रोन ताफ्याला बसला असून, शोध आणि अचूक हल्ल्यांसाठी वापरले जाणारे किमान 30 उच्च तंत्रज्ञानाचे 'रीपर ड्रोन्स' इराणने पाडले, तर एका सबमरीन ड्रोनवर इराणने ताबा मिळवल्याचा दावा केला.

तसेच, कुवेत, बहारीन, कतार, युएई, सौदी अरेबिया, इराकमध्ये स्थित 8 देशांतील अमेरिकन लष्करी तळांची इराणी क्षेपणास्त्रांनी अक्षरशः धूळधाण उडवली. लॉजिस्टिक्स पुरवठा ठप्प झाल्यामुळे अमेरिकेला आपला सपोर्ट बेस हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया येथे हलवावा लागला, जिथून रसद पोहोचवण्यासाठी तब्बल 14 ते 18 दिवसांचा कालावधी लागत आहे. याशिवाय, इराक आणि सौदीतील अमेरिकन दूतावासांवर झालेल्या शेकडो हल्ल्यांमुळे कोट्यवधी डॉलरचे नुकसान झाले असून कुवेतमधील दूतावास बंद करण्याची वेळ आली.

या ऑडिट अहवालाने अमेरिकेच्या शस्त्रसाठ्याची बिकट परिस्थिती उघडी पाडली. तब्बल 22 अब्ज डॉलरचा दारुगोळा संपल्यामुळे आता नवीन शस्त्रास्त्रांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. अमेरिकन शस्त्रास्त्रांचा साठा अमर्याद आहे आणि युद्धात कोणतीही टंचाई नाही, या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची हवा या अहवालाने पूर्णपणे काढून टाकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT