America News: सध्या अमेरिकेत ड्रग्जचा मोठा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये व्यसनाधीन तरुणांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. हे धोकादायक ड्रग्ज लोकांच्या शरीरात गेल्यानंतर त्यांची त्वचा सडतेय. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे, हे ड्रग्ज अमेरिकेतील रस्त्या-रस्त्यांवर सहज उपलब्ध होत आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील (America) फिलाडेल्फियाच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या एका नवीन ड्रग्जने डॉक्टर हैराण झाले आहेत. त्याचा परिणाम दिसू लागल्याने डॉक्टरही चिंतेत आहेत. कारण ते अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची त्वचा सडत चालली आहे.
Xylazine नावाचे हे औषध लोकांसाठी त्रासदायक ठरले असून अनेक शहरांमध्ये त्याचा कहर दिसून येत आहे. डॉक्टर या औषधांना 'झोम्बी ड्रग्ज' देखील म्हणत आहेत. तसेच, ड्रग्ज ही अमेरिकेत नेहमीच सर्वात मोठी समस्या राहिली आहे. परंतु एवढी वाईट परिस्थिती याआधी कधी पाहिली नव्हती.
अमेरिकन सरकारच्या (Government) अहवालानुसार, ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दर 5 मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. आता या ड्रग्जने लोकांसाठी एक नवीन समस्या आणली आहेच, पण ड्रग्जचे व्यसनीही ते घेत आहेत.
हे औषध फेंटनी नावाच्या अफूमध्ये मिसळल्याने अधिक धोकादायक बनले आहे. जेव्हा दोन्ही औषधे मिसळतात तेव्हा त्याला 'ट्रॅनक्विलो डोप' म्हणतात.
दुसरीकडे, ड्रग्जने आधीच अमेरिकन तरुणांना उद्ध्वस्त केले आहे. आता या नवीन ड्रग्जमुळे अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे, त्यामुळे तेथील तरुण आणि कुटुंबीय प्रचंड नाराज आहेत.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येकजण कमी पैशात हे औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करु शकतो. या अमली पदार्थांमधील नशा दीर्घकाळापर्यंत राहते, हेही त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना (Merchants) समजले आहे. त्यामुळे तरुण वर्ग याकडे आकर्षित होत आहे.
या ड्रग्जमुळे त्वचा इतकी सडते की त्या भागाला स्पर्श केला तर ती ब्लेडने कापण्याची गरज राहत नाही. हे औषध घेणार्या लोकांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या सर्वात जास्त दिसून येते.
तसेच, सॅम नावाच्या एका 28 वर्षीय व्यक्तीने सांगितले की, हे ड्रग्ज मुळात लोकांच्या शरीराला झोम्बीफाय करते. 9 महिन्यांपूर्वी मला कधीही जखम झाली नव्हती. आता ठिकठिकाणी पायाला छिद्रे पडली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.