all we imagine as light wins grand prix award at cannes 2024 payal kapadias movie  dainik gomantak
ग्लोबल

Cannes 2024: पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' चित्रपटाने रचला इतिहास, जिंकला ग्रँड प्रिक्स पुरस्कार

Cannes Film Festival 2024: 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा भारतीय चित्रपट पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Cannes Film Festival 2024: 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा भारतीय चित्रपट पाहायला मिळाला. पायल कपाडियाच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाने फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकला. ‘पाल्मे डी’ओर नंतर ग्रँड प्रिक्स हा फिल्म फेस्टिव्हलचा दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. पायल कपाडिया दिग्दर्शित या चित्रपटात कानी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचवेळी, ‘पाल्मे डी’ओर पुरस्कार 'अनोरा'ला मिळाला.

'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'ने इतिहास रचला

'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'चा प्रीमियर 23 मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या नॉमिनेट कॅटेगरीमध्ये दाखवण्यात आला. 30 वर्षांत फेस्टिव्हलच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. 1994 मध्ये शाजी एन करुण यांचा 'स्वाहम' हा नॉमिनेट कॅटेगरीमध्ये पोहोचणारा शेवटचा भारतीय चित्रपट होता.

30 वर्षांनंतर संधी मिळाली

भारतातील शेवटचा चित्रपट 30 वर्षांपूर्वी कान्समध्ये नामांकित झाला होता. आता 30 वर्षांनंतर, जेव्हा भारताला ही संधी मिळाली, तेव्हा पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाइटने बाजी मारली. देशासाठी हा एक मोठा पुरस्कार जिंकला. पायलने या चित्रपटाचे लेखनही केले आहे. थॉमस हकीम, रणबीर दास आणि ज्युलियन ग्रोफ यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. कणी कुश्रुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांनी या चित्रपटात काम केले आहे. त्याची कहाणी मुंबईत राहणाऱ्या दोन महिलांची आहे, ज्या प्रतिकूल परिस्थितीत आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

'ऑल वी इमॅजिन एज लाईट' ची कहाणी

पायल कपाडिया लिखित 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' ही केरळमधील दोन नर्सेसची कहाणी आहे. कहाणीच्या केंद्रस्थानी नर्स प्रभा आहे, जीची भूमिका कानी कुसरुतीने केली आहे. जेव्हा तिला तिच्या विभक्त झालेल्या पतीकडून अनपेक्षित भेट मिळते आणि तिच्या दीर्घकाळ दडपलेल्या भावना पुन्हा जागृत होतात. प्रभा तिच्या भूतकाळातील गुंतागुंतीशी झुंजत असताना, तिची छोटी रुममेट अनु प्रेमाची सुरुवात करते. मुंबईच्या व्यस्त रस्त्यांवर सुंदरपणे हा चित्रपट चित्रित केला आहे. चित्रपट या दोन्ही विरोधाभासी कहाण्या एकत्र आणतो, आणि त्यातील पात्रांच्या भावना आणि संघर्षांची झलक देतो. प्रभाच्या आत्म-शोधाच्या प्रवासापासून ते अनुच्या बहरत्या प्रेमापर्यंत, 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' चित्रपट प्रेम आणि आनंदाच्या शोधाचा सुंदर मिलाफ घडवून आणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT