K-Pop Band BTS Dainik Gomantak
ग्लोबल

K-Pop Band BTS: प्रसिद्ध के-पॉप बँड BTS चा मोठा निर्णय, सर्वजण बजावणार लष्करी सेवा

दक्षिण कोरियात 18 ते 28 वयातील सर्वांना लष्करी सेवेत काम करणे बंधनकारक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जगप्रसिद्ध के-पॉप बँडने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे BTS बँडचे सर्वजण सैन्य दलात सेवा बजावणार आहेत. बँडचे सर्वात जुने सदस्य 'जिन' यांच्यापासून या लष्करी सेवेची सुरूवात होणार आहे. 2013 साली सुरू झालेल्या BTS बँड अल्प काळात प्रसिद्ध झाला व सर्वदूर पोहचला. BTS ने लष्करी सेवेचा निर्णय घेतलेल्यांना हा बँड नेटवर सध्या ट्रेन्ड करतो आहे. बँडच्या सर्व सदस्यांचे नेटकरी कौतुक करत आहेत.

K-Pop Band BTS

दक्षिण कोरियात 18 ते 28 वयातील सर्वांना लष्करी सेवेत काम करणे बंधनकारक आहे. या वयातील व्यकींना 18 ते 21 महिने सेवेत काम करावेच लागते असा नियम आहे. उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमाविरोधात सक्षमपणे लढण्यासाठी दक्षिण कोरिया काम करत आहे. याचाच भाग म्हणून हा नियम करण्यात आला आहे. आता यासाठी BTS बँडने देखील पुढाकार घेतल्याने बँडवरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.

BTS बँडने जुन दरम्यान आपल्या संगीत कार्यक्रमांना काहीसा ब्रेक दिला होता. त्यावरून बँडच्या भवितव्याबाबत देखी चर्चा झाली होती. दरम्यान, बँडने आता बुसान शहरात मोफत कॉन्सर्ट आयोजित केली आहे. दक्षिण कोरियाच्या जागतिक प्रदर्शन 2023 च्या समर्थनात हा संगीत कार्यक्रम केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT