Alaska Charter Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

आकाशातून थेट मृत्यूच्या खाईत! अमेरिकेतील भीषण विमान दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू

US Military Charter Aircraft Accident Alaska: अलास्का येथील एका दुर्गम भागात चार्टर विमानाचा अपघात होऊन विमानातील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

US Military Charter Aircraft Accident Alaska: अमेरिकेतील अलास्का येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण विमान दुर्घटना घडली. अलास्का येथील एका दुर्गम भागात चार्टर विमानाचा अपघात होऊन विमानातील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन लष्कराने या अपघाताची पुष्टी केली. हे चार्टर विमान आठ जणांना घेऊन जात असताना पाश्चिम अलास्का येथील एका दुर्गम रडार साईटवर दुर्घटनाग्रस्त झाले. हा अपघात गुरुवारी अलास्कातील अँकोरेज शहरापासून सुमारे 450 मैल पश्चिमेला असलेल्या केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साईट विमानतळाजवळ घडला.

या घटनेची माहिती मिळताच अलास्का रेस्क्यू कॉर्डीनेशन सेंटरने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरु केली. अपघातात (Accident) ठार झालेल्यांमध्ये दोन पायलट आणि सहा प्रवाशांचा समावेश होता. या विमानाने अँकोरेजवरुन उड्डाण घेतले होते आणि गुरुवारी दुपारी ते केप न्यूएनहॅम जवळ कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या दुर्घटनेनंतर अमेरिकन एअर फोर्सचे लेफ्टनंट जनरल रॉबर्ट डेव्हिस यांनी दुःख व्यक्त केले. ते अलास्का कमांड, अलास्का नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड रिजन आणि 11व्या एअर फोर्सचे कमांडर आहेत. ही घटना आमच्या लष्करी कुटुंबासाठी आणि आम्ही सेवा देत असलेल्या संपूर्ण समुदायासाठी एक खूप मोठा धक्का आणि मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. National Transportation Safety Board (NTSB) चे अलास्का रिजन प्रमुख क्लिंट जॉन्सन यांनी अपघाताच्या तपासाबाबत माहिती दिली.

या अपघातावर अलास्कातील लोकप्रतिनिधींनी देखील संवेदना प्रकट केल्या. अलास्काच्या सिनेटर लिसा मुर्कोव्स्की यांनी 'एक्स' वर पोस्ट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, केप न्यूएनहॅम येथे झालेल्या विमान अपघाताची बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला असून मी अलास्काच्या जनतेसोबत माझ्या संवेदना व्यक्त करते. सिक्युरिटी एव्हिएशनच्या टीमसोबत मी संपूर्ण अलास्कामध्ये बराच प्रवास केला असून त्यांच्या अनुभवी वैमानिकांना ओळखते. तातडीने घटनास्थळी पोहोचल्याबद्दल त्यांनी कोस्ट गार्ड, एनटीएसबी आणि रेस्क्यू टीमचे आभार मानले.

तसेच, अलास्काचे नेते डॅन सुलिव्हन यांनीदेखील 'एक्स' वर पोस्ट करत अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना केली. या भयानक अपघातामागील नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी NTSB आणि FAA कडून सविस्तर माहिती मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Goa SIR Voter Deletion: 'सॉफ्टवेअरची चूक, शिक्षा मतदारांना का?'; निवडणूक आयोगाची गोवा खंडपीठाकडून झाडाझडती

Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

Children Screen Time Control: मुलांच्या 'स्क्रीनटाईम'वर हवं नियंत्रण; आधी पालकांनीच मोबाईल बाजूला ठेवायला हवा

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

SCROLL FOR NEXT