Al Shabaab Dainik Gomantak
ग्लोबल

Al Shabaab Somalia: अल शबाबने घेतला युगांडाच्या 54 सैनिकांचा बळी; दहशतवादी संघटनेबाबत या गोष्टी माहितायेत का?

Al Shabaab Latest News: अल शबाब या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारप्रमाणे सोमालियामध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे दहशतवादी आत्मघातकी हल्ले करत आहेत.

Ashutosh Masgaunde

Al Shabaab Killed 50 soldiers of Uganda

आफ्रिकेत कट्टर इस्लामिक संघटना अल शबाब आणि युगांडाच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी सांगितले की, अल शबाबच्या हल्ल्यात त्यांचे ५४ सैनिक शहीद झाले आहेत.

योवेरी यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला सोमालियातील लष्करी तळावर करण्यात आला, जिथे युगांडाचे शांतीरक्षक तैनात होते.

युगांडाचे अध्यक्ष योवेरी म्हणाले की, अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी गेल्या शुक्रवारी, 2 जूनच्या पहाटे सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 130 किमी (80 मैल) नैऋत्येस बुल्मारेर येथे लष्करी तळाला लक्ष्य केले.

राष्ट्रपती म्हणाले, "त्या हल्ल्यानंतर, आमच्या सैनिकांनी वीरतापूर्वक दहशतवाद्यांशी मुकाबला केला आणि लष्करी तळावर पुन्हा ताबा मिळवला."

युगांडा पीपल्स डिफेन्स फोर्स लढत आहेत

योवेरी म्हणाले की युगांडा पीपल्स डिफेन्स फोर्सेस (UPDF) ने कट्टर इस्लामिक संघटना अल शबाबला माघार घेण्यास भाग पाडून प्रत्युत्तर दिले.

तत्पूर्वी, मुसेवेनी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की अल शबाबच्या हल्ल्यांमुळे युगांडात जीवितहानी झाली होती, परंतु सोमालियातील आफ्रिकन युनियन ट्रान्सिशनल मिशन (एटीएमआयएस) मध्ये पाठवलेल्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल अधिक तपशील दिले नाहीत.

अल शबाबने अनेक देशांमध्ये हल्ले केले

अल शबाबने केवळ युगांडामध्येच नाही तर इतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये अल शबाबने अनेक सोमालियन नागरिकांची हत्या केली. त्याच वेळी, मसागावा येथील लष्करी अधिकारी कॅप्टन अब्दुल्लाही मोहम्मद यांनी सांगितले की, शहराच्या काठावर तासनतास लढाई सुरू होती.

मोहम्मद म्हणाले, "आतापर्यंत आम्ही आमचे अनेक सैनिक गमावले आहेत हे जाणून मला खूप दुःख झाले आहे, परंतु त्या शहीदांची नेमकी आकडेवारी माझ्याकडे नाही." अल-शबाबला हुसकावून लावले गेले आहे आणि आता आम्ही त्यांचा जंगलात पाठलाग करत आहोत.

क्रुर संघटनेचा उदय

अल शबाब ही इस्लामिक राजवटीच्या नावाने तयार झालेली एक क्रुर संघटना आहे, जिला तालिबानकडून प्रशिक्षण मिळाले आहे.

अल शबाबने एका निवेदनात म्हटले आहे की ते जिहाद करत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आत्मघाती हल्ले करून १३७ जवानांना ठार केले आहे. या संघटनेला सोमालियातील पाश्चिमात्य-समर्थित सरकार उलथून तेथे इस्लामिक शासन लागू करायचे आहे.

2006 मध्ये सोमालियामध्ये लष्कराकडून पराभूत झाल्यानंतर या संघटनेने आपले सैनिक अफगाणिस्तानातील तालिबानकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. त्याच्या दहशतवाद्यांची संख्या सुमारे 15 हजार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघटना 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण देते. त्यासाठी अल-शबाबच्या ताब्यात असलेल्या भागात शाळाही चालवल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT