Al-Qaeda Chief
Al-Qaeda Chief  Dainik Gomantak
ग्लोबल

Al-Qaeda प्रमुखाचा नवा व्हिडिओ जारी, 'कलम 370 हटवणं म्हणजे...'

दैनिक गोमन्तक

जागतिक दहशतवादी संघटना असणाऱ्या अल-कायदा (Al-Qaeda new video) ने काश्मीरसंदर्भात आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, ज्यामध्ये कलम 370 हटवण्याला 'मुस्लिमांच्या अधिकाराचं हनन' म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) घटनेच्या कलम 370 आणि कलम 35A अंतर्गत विशेष दर्जा मिळालेला होता. 2019 मध्ये, 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने (Central Government) कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. आता अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर मुद्द्यावर अरब देश भारताला तथाकथित पाठिंबा देत असल्याच्या कारणावरुन जवाहिरीने टीका केली आहे. त्याचबरोबर त्याने जम्मू-काश्मीर आणि पॅलेस्टाईनची बरोबरी करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ अल-कायदाच्या मीडिया शाखा अस-साहबने जारी केला आहे. ज्यामध्ये जामिया विद्यापीठातील नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निषेधाचे व्हिडिओ दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये लोक हिजाब आणि भारतातील हिंसाचाराच्या इतर व्हिज्युअल्सच्या बाजूने विरोध करत असल्याचे दाखवले आहे.

भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला

अल-जवाहिरीने इस्रायल आणि भारताची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘शत्रू’ म्हटले. काश्मीरमधली लढाई ही 'मुस्लिम आणि जिहादची लढाई' असल्याचे तो म्हणाला. व्हिडिओच्या माध्यमातून दहशतवादी संघटना अल-कायदाने भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. जवाहिरीने काश्मीरमधील जनतेला शस्त्रं उचलण्याचं आवाहन देखील केलं आहे. पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यापासून ही संघटना अल-जवाहिरी चालवत आहे. सध्या जवाहिरी अज्ञात ठिकाणाहून आपली संघटना चालवत आहे.

AQIS च्या स्थापनेची घोषणा केली

यापूर्वी 2014 मध्ये अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरीने AQIS स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याचा प्रमुख भारतात जन्मलेल्या आशिम उमरला करण्यात आले. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार आणि बांगलादेशच्या सरकारांविरुद्ध जिहाद पुकारणे हा त्याचा उद्देश आहे. जवाहिरीने यापूर्वीही अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. ज्यामध्ये तो लोकांना भडकावून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करतो. याआधीही अनेकवेळा अल-जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र त्याची काश्मीर आणि संयुक्त राष्ट्रांबाबत भडकावणारी वक्तव्ये समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादाच्या जगात हे एक मोठे नाव आहे, ज्याला आतापर्यंत गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी मृत घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT