IMRAN KHAN
IMRAN KHANDainik Gomantak

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; संपत्ती आणि उत्पन्नाची होणार चौकशी

पाकिस्थानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिले चौकशीचे आदेश
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रमान खान यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी खान यांच्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणा दिल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा इम्रमान खान यांच्या कडे पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणात परकिय संपत्ती जमल्याचं कारण देत संपत्तीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Imran Khan's difficulties increased; Assets and Income Inquiry Orders )

IMRAN KHAN
खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान तहकीक-ए-इंसाफने केंद्रीय सचिवालयातील कर्मचारी ताहिर इक्बाल, मोहम्मद नोमान औझल, मोहम्मद अर्शद आणि मोहम्मद रफिक यांच्या खात्याचीही तपासणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार सरकारने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

IMRAN KHAN
सर्वोच्च न्यायालयात 5 वर्षानंतर 2 अल्पसंख्याक समाजातील न्यायाधीशांची नियुक्ती

या चौकशीद्वारे इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या आंतरराष्ट्रीय बँक खात्यांचा तपशील मागवण्यास आला असून सरकार इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयला 2013 पासून विदेशातून मिळलेल्या निधीची चौकशी करणार असल्याचे बोललं जात आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या चार पक्ष कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम आल्याची नोंद सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानकडून मागवली जात आहे. एवढेच नाही तर पुराव्याच्या आधारे त्यांना अटकही होऊ शकते.

इम्रान यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप

इम्रान खान यांचे जुने सहकारी अलीम खान आणि जहांगीर खान तरीन यांनी यापूर्वी इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. याला प्रत्युत्तर देत इम्रान खान यांनी सध्याच्या सरकारवर हल्ला केला आणि जुन्या सहकाऱ्यांवर आपल्या कार्यकाळात बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com