अफगाणिस्तानमधील (Afghanistan) बदलत्या परिस्थितीमुळे, बायडन प्रशासनाच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे. यातच आता अल-कायदा (al Qaeda) अफगाणिस्तानामध्ये पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. वास्तविक, अल कायदा ही एक दहशतवादी संघटना आहे, ज्याने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर हल्ला केला होता. ट्रम्प प्रशासनातील दहशतवादविरोधी वरिष्ठ संचालक ख्रिस कोस्टा म्हणतात, "अमेरिकन सैन्यांची माघार आणि अफगाणिस्तानात तालिबानचा उदय झाल्यामुळे अल-कायदाला संधी आहे आणि त्यांनी ती संधी घेतली."
ते पुढे म्हणाले की, तालिबानची अफगाणिस्तानवरील पकड जगभरातील जिहादींसाठी आनंदाची गोष्ट मानली जात आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरुद्धच्या 20 वर्षांच्या युद्धात अल-कायदाचा दर्जा लक्षणीय घसरला होता. परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 1 जूनच्या अहवालात असे म्हटले आहे की, शेकडो सशस्त्र कार्यकर्त्यांसह तालिबानी गटाचे वरिष्ठ नेतृत्व अफगाणिस्तानमध्ये उपस्थित आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघार घेतल्याने उडाली खळबळ
11 सप्टेंबरच्या हल्ल्यापूर्वी अल-कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा तालिबान "मैत्री, सामायिक संघर्ष, वैचारिक सहानुभूती आणि मागील इतिहासाच्या आधारावर ते एकत्रित आले आहेत. हे ज्ञात आहे की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्यामुळे पाश्चिमात्य देशांना विरोध करणारे जिहादी गट उत्साहित होत आहेत. कारण त्याच पाश्चिमात्य सैन्याने तालिबान आणि अल कायदाला अफगाणिस्तानातून हाकलून लावले होते. आता तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने तथाकथित इस्लामिक स्टेट सारख्या अतिरेकी संघटनांसाठी सुपीक जमीन तयार झाली आहे.
अफगाणिस्तानमधील संकटावर तातडीची बैठक
दुसरीकडे, अफगाणिस्तानमधील संकटावर तातडीच्या बैठकीनंतर ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इशारा दिला की, अफगाणिस्तान पुन्हा अतिरेक्यांचे आश्रयस्थान बनू नये यासाठी पाश्चिमात्य देशांनी संघटित झाले पाहिजे. सोमवारी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला "अफगाणिस्तानमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धोका कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे" आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.