Imran Khan & Bushra Bibi Dainik Gomantak
ग्लोबल

Al Qadir Trust Case: बुशरा बीबीला लाहोर HC चा दिलासा, जामीन केला मंजूर; इम्रान खान यांच्यासंबंधी निर्णय प्रलंबित

Al Qadir Trust Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

Al Qadir Trust Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात ते सोमवारी पुन्हा पत्नी बुशरा बीबीसह लाहोर उच्च न्यायालयात हजर झाले, जिथे न्यायालयाने 23 मे पर्यंत त्यांच्या पत्नीला संरक्षणात्मक जामीन मंजूर केला.

त्याचबरोबर, इम्रान यांच्या जामीनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रकरणी बुशरा बीबी यांनी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी 9 मे रोजी इम्रान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात ताब्यात घेतले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) इम्रान यांना दिलासा देत सुटका केली होती. त्याचबरोबर, दुसऱ्याच दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही इम्रान यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला.

इम्रान यांची रावळपिंडीत चौकशी करण्यात आली

इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केल्यानंतर NAB कार्यालयात नेण्यात आले होते. NAB कार्यालय रावळपिंडी येथे आहे. या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, या बेकायदेशीर अटकेला पक्षाच्या नेतृत्वाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना दिलासा मिळाला.

एनएबीचे म्हणणे आहे की, इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी आणि इतरांवर अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टच्या नावावर शेकडो कनाल जमीन घेतल्याचा आरोप आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, 9 मे रोजी इम्रान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ, तोडफोड केली.

लष्करी अधिकाऱ्यांची घरे जाळण्यात आली, दुकाने लुटली गेली. तर, दगडफेकीत शेकडो लोक जखमी झाले असून 47 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या पक्षाच्या 7000 कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

तसेच, जाळपोळ आणि गोळीबारामुळे झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याची चौकशी झाली नसल्याचे इम्रान खान यांचे म्हणणे आहे.

सुमारे 7000 पीटीआय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान, आमच्या सुरक्षा एजन्सी गुंडांना सर्वोच्च न्यायालयावर कब्जा करण्यासाठी आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी मदत करत आहेत.

संविधान आणि सर्वोच्च न्यायालय नष्ट झाले तर पाकिस्तानच्या स्वप्नांचा अंत होईल, असेही इम्रान खान म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एकतेचा संदेश..!

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT