

Prayagraj Sex Racket Busted 2026: उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सुरु असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शहरातील जुन्या आणि गजबजलेल्या कीडगंज परिसरात पोलिसांनी छापा टाकून 4 मुले आणि 4 मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी दलाल सर्वेश दुबे यालाही अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कीडगंज परिसरात एका महिला आयएएस अधिकाऱ्याचा बंगला आहे. या महिला अधिकाऱ्याने सर्वेश दुबे नावाच्या व्यक्तीला 15000 रुपये प्रति महिना या दराने हे घर भाड्याने दिले होते. मात्र, सर्वेशने या घराचा वापर राहण्यासाठी न करता तिथे 'हायप्रोफाईल सेक्स रॅकेट' चालवण्यासाठी केला. गेल्या काही दिवसांपासून या घरात तरुण मुले आणि मुलींची सतत ये-जा सुरु होती. रहिवासी भागात अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींमुळे शेजारी राहणारे नागरिक त्रस्त झाले होते.
दररोज नवनवीन चेहरे आणि रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या गाड्यांच्या येण्या-जाण्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबद्दल स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत एक गुप्त माहितीदार या घरावर नजर ठेवण्यासाठी तैनात केला. गुप्तहेराने पोलिसांना कळवले की, रात्रीच्या वेळी तरुण-तरुणी आत जातात आणि तासाभरानंतर बाहेर पडतात. संशय बळावल्यावर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करुन रात्रीच्या वेळी या घरावर छापा टाकला.
पोलिस (Police) पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी वारंवार दरवाजा ठोठावूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर पोलिसांना जे दृश्य दिसले ते पाहून त्यांनाही धक्का बसला. चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 4 तरुण आणि 4 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून झडतीदरम्यान खोल्यांमधून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या.
दरम्यान, या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सर्वेश दुबे असल्याचे तपासात समोर आले आहे. सर्वेश हा ग्राहकांशी मुलींचा सौदा करायचा आणि त्यांना या घरी बोलवायचा. जेव्हा ग्राहक आत असायचे, तेव्हा सर्वेश स्वतः घराबाहेर थांबून टेहळणी करायचा, जेणेकरुन कोणालाही संशय येऊ नये. पकडलेल्या मुलींपैकी काही पश्चिम बंगाल, वाराणसी आणि दोन स्थानिक प्रयागराजमधील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेले चारही तरुण प्रयागराजमधीलच रहिवासी असल्याचे समजते.
पोलिसांनी सर्व आठ तरुण-तरुणी आणि दलाल सर्वेश दुबे यांच्याविरुद्ध 'अनैतिक देह व्यापार (प्रतिबंधक) अधिनियमा'च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हे रॅकेट आणखी कुठे पसरले आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, एका जबाबदार सरकारी अधिकाऱ्याच्या घरात हा प्रकार घडल्याने घर भाड्याने देताना करण्यात येणाऱ्या 'पोलीस व्हेरिफिकेशन'च्या मुद्द्यावरही आता चर्चा सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.