Ukraine Russia war
Ukraine Russia war Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियाकडून हल्ल्याची भीती! युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रविवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रशियाचे अध्यक्ष पुतिन (Putin) यांनीही सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी संपूर्ण युक्रेनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या दोन देशांमध्ये फक्त काही भागातच लढत आहे, पण सोमवारच्या बैठकीत पुतिन यांच्या बाजूने काही मोठी कारवाई केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता संपूर्ण युक्रेनसाठी एअर अलर्ट चिंतेचा विषय आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या युद्धादरम्यान शनिवारी (8 ऑक्टोबर) रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधील पुलावर मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे सहकारी मायखाइलो पोडोल्याकी यांनी सांगितले की, ही फक्त सुरुवात होती. क्रिमियामध्ये उपस्थित असलेल्या रशियन सैनिकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण युक्रेनमधील रशियन सैन्याला रसद पुरवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. 

* पुलावरील स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार धरण्यात आले

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर हा बॉम्बस्फोट झाला. पुलावरील स्फोटासाठी पुतिन यांनी युक्रेनला जबाबदार धरले. क्रिमियामध्ये झालेल्या स्फोटानंतर रशियाकडून काही मोठे पाऊल उचलले जाऊ शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे. 

* रशियन सैन्यावर टीका केली

अलीकडे अनेक लष्करी अपयशानंतर रशियन सैन्याच्या नेतृत्वावरही टीका झाली. त्यानंतर रशियाने शनिवारी सर्गेई सुरोविकिन यांची युक्रेनवरील आक्रमणाचे नेतृत्व करण्यासाठी नवीन जनरल म्हणून नियुक्ती केली. सप्टेंबरच्या सुरुवातीस, युक्रेनने उत्तरपूर्व स्ट्राइकमध्ये रशियन सैन्याला ईशान्य खार्किव प्रदेशातून परतवून लावले. त्यानंतर युक्रेनने हजारो चौरस किलोमीटरचा प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. 

पुतिन मोठे पाऊल उचलू शकतात?

रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील लायमन ट्रान्सपोर्ट हब तसेच दक्षिणेकडील खेरसन प्रदेशावरील नियंत्रण देखील गमावले. या अपयशानंतर, चेचन्या प्रदेश प्रमुख रमजान कादिरोव यांच्यासह अनेक रशियन समर्थक नेत्यांनी रशियाच्या नेतृत्वावर टीका केली. ही संपूर्ण घटना पाहता पुतिन आता काही मोठे पाऊल उचलू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT