Albania virtual minister  Dainik Gomantak
ग्लोबल

First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

Daila AI Minister Albania: अल्बानियातील ‘एआय’ जनरेटेड मंत्री ‘डायला’च्या व्हर्च्युअल अवताराने प्रथमच देशाच्या संसदेमध्ये भाषण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sameer Panditrao

तिराना : मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) आता राजकारणातही प्रवेश केला आहे. अल्बानियातील ‘एआय’ जनरेटेड मंत्री ‘डायला’च्या व्हर्च्युअल अवताराने प्रथमच देशाच्या संसदेमध्ये भाषण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आपल्यापासून राज्यघटनेला धोका नसल्याचे सांगतानाच तिने सत्तेमध्ये असलेल्यांकडून घेतले जाणारे अमानवीय निर्णय हाच खरा धोका असल्याचे म्हटले आहे. अल्बानियाच्या भाषेमध्ये ‘डायला’ या शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो. ‘डायला’ ही फक्त आभासी प्रतिमा असून ती ह्युमनॉइड रोबो नाही.

डायला तिची भूमिका स्पष्ट करताना म्हणाली, की ‘‘मी इथे माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांना मदत करण्यासाठी आली आहे. मी माणूस नसल्याने काहीजणांनी मला घटनाबाह्य ठरविले. पण एक गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे राज्यघटनेला यंत्रांचा धोका कधीच नव्हता. जे सत्तेत असून अमानवीय निर्णय घेतात त्यांच्यापासून खरा धोका आहे.’’

डायलाच्या व्हर्च्युअल अवताराला संसदेत भाषण करण्यासाठी खास पारंपरिक पोशाख घालण्यात आला होता. एखाद्या देशामध्ये ‘एआय जनरेटेड’ मंत्र्याकडे (बॉट) एखादे खाते सोपविले जाण्याची ही पहिलीच वेळ असून मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान इदी रामा यांनीच डायलाकडे मंत्रिपद सोपविले होते.

या बॉटने आता काही घटनात्मक बाबींवर देखील चिंता व्यक्त केली. ‘‘कायद्यामध्ये कर्तव्ये, जबाबदाऱ्या, पारदर्शकता आणि सर्वांना समान वागणूक आदी बाबींचा समावेश असतो. मानवाची मित्र या नात्याने मी ही मूल्ये जपेल याची हमी तुम्हाला देते. कदाचित मानवापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी माझे कर्तव्य पार पाडेल,’’ असे डायलाने म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी बॉट

जनहितार्थ कामांसाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमधील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी अल्बानियाच्या पंतप्रधानांनी या ‘एआय बॉट’कडेच मंत्रिमंडळातील खाते सोपविण्याचा निर्णय घेतला होता. यंदा जानेवारी महिन्यामध्ये ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून या ‘एआय’च्या वापराला सुरुवात करण्यात आली होती. लोकांना ‘इ- अल्बानिया’ या प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा हे शिकविण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान भ्रष्टाचार ही अल्बानियातील सर्वांत मोठी समस्या आहे. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये १८० देशांच्या क्रमवारीमध्ये हा देश ८० व्या स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यातली गुंडगिरी मुळासकट संपवणार" काणकोणकर हल्ल्यानंतर CM सावंतांचा Action Mode

भारतासोबत युद्ध झाल्यास सौदी पाकिस्तानला मदत करणार का? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने काय उत्तर दिलं पाहा Video

सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

Vagator: 'सगळे पाणी हॉटेल्सना जातेय, आम्हाला काय'? वागातोर ग्रामस्थांची ‘पेयजल’च्या कार्यालयावर धडक; गैरव्यवस्थापन थांबवण्याची मागणी

Goa Live Updates: मंत्री तवडकरांची पुन्हा गावडेंवर टीका

SCROLL FOR NEXT