AI Controlled Fighter Jets VISTA F16 Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

AI Controlled Fighter Jets VISTA F16: अमेरिकेने एका खास प्रकारच्या फायटर जेटची चाचणी घेतली आहे.

Manish Jadhav

AI Controlled Fighter Jets VISTA F16: अमेरिकेने एका खास प्रकारच्या फायटर जेटची चाचणी घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नियंत्रित F-16 लढाऊ विमानाची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात चाचणी घेण्यात आली. गेल्या महिन्यात सिनेटच्या एप्रोप्रिएशन कमेटीने डिफेन्स पॅनलसमोर याची घोषणा केली होती. दरम्यान, हे पहिले वॉर प्लेन आहे जे मानवरहित आहे. 2028 पर्यंत ते अमेरिकेन लष्कराचा भाग बनले असे सांगण्यात येत आहे. हे प्लेन अमेरिकन लष्करासाठी मोठा बदल घडवणारे ठरु शकते. चला तर मग नवीन AI फायटर जेट कसे आहे आणि ते किती वेगळे आहे ते जाणून घ्या.

नवीन AI फायटर जेट कसे काम करते?

दरम्यान, हे फायटर जेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ते चालवण्यासाठी पायलटची गरज नाही. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) मदतीने चालवले जाते. नुकत्याच झालेल्या चाचणीदरम्यान अमेरिकन हवाई दलाचे सचिव फ्रँक केंडल यांनी फायटर जेटची सफर केली. अमेरिकन हवाई दल या फायटर जेटबद्दल खूप उत्साहित आहे, कारण ते एआयच्या शक्तीने सुसज्ज आहे. ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात आहे अशा ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे शत्रूला धडा शिकवण्यासोबतच युद्ध मोहिमांमध्ये होणारे मानवी मृत्यू रोखले जातील. मात्र, या फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेल्या ऑटोनॉमस वेपन सिस्टमवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी येत्या काही वर्षांत अशी 1 हजार मानवरहित वॉर प्लेन तयार करण्याची अमेरिकन लष्कराची योजना आहे.

नवीन एआय फायटर जेट किती हायटेक आहे?

कॅलिफोर्नियातील (California) एडवर्ड एअर फोर्स बेसवरुन उड्डाण करण्यात आलेल्या या फायटर जेटच्या वेगाने आवाजाच्या वेगाचा विक्रम मोडल्याचा दावा करण्यात आला आहे. यूएस एअर फोर्स सेक्रेटरी फ्रँक केंडल यांनी देखील पाहिले की, ते रिअल टाइममध्ये किती चांगले कार्य करते. लष्कराला एआयशी जोडून सुरक्षेत आणखी सुधारणा केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. शत्रूविरुद्ध विशेष रणनीती बनवण्यासोबतच पैशाचीही बचत होईल. तर व्हिस्टा मिलिटरी ऑपरेटरचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाकडे असे एआय जेट नाही. त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा अपडेट केला आहे. यामुळे प्रत्यक्ष वेळेत कारवाई केली जाते.

AI फायटर जेट व्हिस्टा 885 किलोमीटर वेगाने धावते

या AI फायटर जेट F-16 ला Vista असे नाव देण्यात आले आहे. चाचण्यांदरम्यान, फ्रँक केंडल यांनी 885 किलोमीटर प्रति तास वेगाने व्हिस्टामधून उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT