Ahmed Masood's supporters denied that the Taliban had entered Panjshir Dainik Gomantak
ग्लोबल

पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? अहमद मसूद समर्थकांनी दिले उत्तर

Taliban दावा केला होता की, त्यांचे सैन्य पंजशीर प्रांतात घुसले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर देखील पंजशीर (Panjshir) प्रांतासाठी तालिबानचा संघर्ष सुरुच आहे. मात्र आता पंजशीरमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला होता. हा दावा आता पंजशीरमधील बंडखोरांनी फेटाळून लावला आहे. तालिबानी सैन्य पंजशीरमध्ये कोठेही घुसण्यास असमर्थ असल्याचे सांगत पंजशीरच्या बंडखोरांनी शनिवारी तालिबानचे हे दावे फेटाळून लावले आहेत.

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अहमद मसूदच्या समर्थकांनी तालिबानने पंजशीरच्या दिशेने कुच केल्याचा दावा फेटाळून लावताना कोणीही पंजशीर प्रांतात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्रोही आघाडीच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मोहम्मद अल्मास झाहिद म्हणाले, "पंजशीरमध्ये कोणतीही लढाई नाही आणि कोणीही पंजशीर प्रांतात प्रवेश केला नाही."

यापूर्वी तालिबानने दावा केला होता की, त्यांचे सैन्य पंजशीर प्रांतात घुसले आहे. तालिबानी नेता अनमुल्ला सामंगानी यांनी टोलो न्यूजला सांगितले की, कोणतीही लढाई झाली नाही, परंतु अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातचे मुजाहिदीन कोणत्याही प्रतिकाराचा सामना न करता वेगवेगळ्या दिशेने पुढे सरकले आहेत. इस्लामिक अमीरातच्या सैन्याने वेगवेगळ्या दिशांनी पंजशीरवर हल्ला केला असुन पंजशीरमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, पंचशीर खोरे हा असा भाग आहे जो, 1990 च्या गृहयुद्धात कधीच तालिबानच्या ताब्यात आला नव्हता. तसेच एक दशकापूर्वी (तत्कालीन) सोव्हिएत युनियनला देखील ते जिंकता आले नव्हते. आम्ही तालिबानला पंजशीरमध्ये प्रवेश करू देणार नाही, असे एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही पुर्ण ताकदीने त्याला विरोध करू आणि लढू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT