Agriculture In Space Dainik Gomantak
ग्लोबल

Agriculture In Space: चीनने असे काय पाठवलंय, ज्यामुळे सुरू झाली अंतराळात शेतीची चर्चा

Tiangong space station: मेरिकेशी स्पर्धा करत चीन आपले अंतराळ स्थानक अवकाशात निर्माण करत आहे. याशिवाय ते अवकाशात नवनवीन प्रयोग करत आहेत.

Ashutosh Masgaunde

China Sends Around 150 types of seeds to its Tiangong space station:

आज चीन अंतराळात आपली ताकद वाढवण्यात मग्न आहे. अमेरिकेशी स्पर्धा करत चीन आपले अंतराळ स्थानक अवकाशात निर्माण करत आहे. याशिवाय ते अवकाशात नवनवीन प्रयोग करत आहेत.

शेनझोऊ 16 मोहिमेअंतर्गत 100 हून अधिक वनस्पतींच्या बिया अंतराळातील तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर पाठवण्यात आल्याचा खुलासा चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे.

चायना मॅनेड स्पेस एजन्सी (CMSA) च्या मते, तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनने मे महिन्याच्या शेवटी 53 संस्थांमधून 136 बिया आणि वनस्पती अनुवांशिक साहित्य अवकाशात पाठवले.

तृणधान्यांसह 47 पिकांचा समावेश

यामध्ये 12 तृणधान्य पीक बियाणे आणि 28 नगदी पिकांच्या बियाण्यांसह 47 पिकांचा समावेश आहे. याशिवाय ७६ प्रजातींच्या वन वनस्पती, गवत, फुले, औषधी वनस्पतीही अवकाशात पाठवण्यात आल्या आहेत.

कृषी आणि औद्योगिक सूक्ष्मजीव, खाद्य बुरशी, एकपेशीय वनस्पती आणि शेवाळांसह तेरा इतर सूक्ष्मजीव देखील कक्षेत पाठवण्यात आले. 1980 पासून चीन अंतराळ प्रजनन प्रयोगांमध्ये गुंतलेला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरही असेच प्रयोग केले जात आहेत.

चीनकडून स्पेस स्टेशनची निर्मिती

चीनने 2022 मध्ये तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनचे बांधकाम पूर्ण केले आहे. सध्या, एक क्रू Shenzhou 16 अंतराळ यानावर त्याच्या कक्षेत पोहोचला आहे. अंतराळ स्थानकावर मानव पाठवण्याची चीनची ही पाचवी मोहीम आहे. शेन्झो 15 चे क्रू मेंबर्स जूनमध्ये पृथ्वीवर परतले. परतल्यानंतर ते पहिल्यांदाच चिनी माध्यमांसमोर आले. या मोहिमेत तीन अंतराळवीर स्पेस स्टेशनवर गेले.

चंद्रावरही रोपे उगवली होती

चीनने चंद्रावरही वनस्पती लावल्या आहेत. चीनने चांग ई-4 या अंतराळयानाद्वारे चंद्रावर वनस्पती असलेली एक पेटी पाठवली. कोणत्याही प्रकारची जैविक सामग्री चंद्रावर पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती.

चीनने येथे रोपे वाढवण्यात यश मिळवले होते. कापसाचे बियाणे एका विशिष्ट प्रकारच्या पेटीत पाठवले जात होते. त्याचबरोबर नासाच्या (NASA) स्पेस स्टेशनमध्ये अनेक पालेभाज्या आणि वनस्पती उगवल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

SCROLL FOR NEXT