Turkmenistan Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरिया नंतर 'या' आशियाई देशाने एकही कोरोना रुग्ण नसल्याचा केला दावा

6 दशलक्ष लोकसंख्या असलेला तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) हा अशा पाच देशांपैकी एक आहे जिथे एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीमुळे (Coronavirus Pandemic) जग अजूनही सावरलेले नाही. आता या महामारीला जवळपास दोन वर्षे होत आले आहेत. मात्र अद्यापही कोरोनाचं संकट कमी झालेले नसताना दुसरीकडे मात्र तुर्कमेनिस्तानने (Turkmenistan) दावा केला आहे की, देशात कोरोनाचा (Covid-19) एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (Johns Hopkins University) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने (WHO) गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, 6 दशलक्ष लोकसंख्या असलेला तुर्कमेनिस्तान हा अशा पाच देशांपैकी एक आहे जिथे एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

तुर्कमेनिस्तान व्यतिरिक्त, प्रशांत महासागरातील इतर तीन लहान देश आहेत, तर चौथा देश उत्तर कोरिया (North Korea) आहे, जिथून आवश्यक माहिती बाहेर येणे पूर्णपणे अशक्य आहे. तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबांगुली बर्दीमुखामेदोव 2006 पासून देशावर राज्य करत आहेत. त्यांनी देशात कोरोनाबाबतच्या अहवालाला बनावट ठरवले असून संयुक्त राष्ट्रांने मंगळवारी एका संबोधनात सांगितले की, कोरोना महामारीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे राजकारण करु नये.

राष्ट्रपती प्रतिमा राखण्यासाठी धोक्याला कमी लेखतात

त्याच वेळी, तुर्कमेनिस्तानबाहेरील स्वतंत्र संस्था आणि पत्रकार, कार्यकर्ते म्हणतात की, देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत असल्याचे पुरावे आहेत. यामुळे, रुग्णालयांवर दबाव वाढत असून लाखो लोक मरत आहेत. त्यांनी इशारा दिला की, राष्ट्रपती आपली प्रतिमा टिकवण्यासाठी कोरोनाच्या धोक्याला कमी लेखत आहेत. तुर्कमेन न्यूजचे रुस्लान तुर्कमेन म्हणाले की, त्यांनी कोविड -19 मुळे मरण पावलेल्या 60 हून अधिक लोकांची नावे गोळा केली आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये शिक्षक, कलाकार आणि डॉक्टरांचा समावेश आहे.

आर्मेनियन सरकारने कोरोनाबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही

तुर्कमेनिस्तानच्या बाहेर राहणारे रुस्लान तुर्कमेन म्हणाले की, त्यांनी आरोग्य रेकॉर्ड आणि क्ष-किरणांसह सर्व नोंदवलेल्या मृत्यूची पडताळणी केली आहे. यामधून हे दर्शवते की, कोरोना पीडितांप्रमाणे त्यांची स्थिती गंभीर होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या बाबींबाबत तुर्कमेन सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तुर्कमेनिस्तान 2020 पासून सांगत आहे की, येथे एकाही कोरोना रुग्णांची नोंद झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT