Taliban  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hezbollah Tension: नेतन्याहू यांनी हिजबुल्लाविरुद्ध युद्धाची घोषणा करताच तालिबानची एन्ट्री; लेबनॉनला पाठवले 1000 हून अधिक सैनिक

Manish Jadhav

Israel Hezbollah Tension: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सुरुच आहे. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांवर हल्ले करत आहे. जोपर्यंत हमासचा नायनाट होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी शपथ इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी घेतली आहे. या युद्धात इस्त्रायल हमासबरोबर हिजबुल्ला, हुथी अशा अनेक संघटनांशी दोन हात करत आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलने लेबनॉनस्थित हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला नेस्तनाबूत केल्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच तालिबाननेही (Taliban) इस्रायल-हमास युद्धात उडी घेतली आहे. या युद्धात तालिबानने थेट एन्ट्री केली आहे. इस्रायलविरुद्धच्या युद्धात हिजबुल्लाला (Hezbollah) पाठिंबा देण्यासाठी तालिबानने 1,000 हून अधिक सैनिक लेबनॉनमध्ये पाठवले आहेत.

दरम्यान, ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक लेबनॉनच्या दिशेने जाताना दिसत आहेत. अफगाणिस्तानातून पहिल्या तुकडीमध्ये 1,000 हून अधिक तालिबानी सैनिकांना लेबनॉनला पाठवण्यात आले आहेत, जे युद्धात हिजबुल्लाला साथ देतील. हे सैनिक आधुनिक शस्त्रे आणि लष्करी वाहनांनी सज्ज आहेत.

तालिबानी सैनिक हातात शस्त्रे घेऊन लष्करी वाहनासह स्केटिंग करताना व्हिडिओमध्ये दिसतायेत. इस्रायल-हमास युद्धात तालिबानच्या थेट एन्ट्रीमुळे मध्य-पूर्व आशियातील युद्धाची व्याप्ती वाढली आहे. तालिबानचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे अब्जावधी किंमतीची अमेरिकन शस्त्रे आहेत, जी अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानात सोडली होती.

इस्रायलची घोषणा काय आहे?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामध्ये हमासचा खात्मा केल्यानंतर हिजबुल्लाविरुद्ध मोठ्या युद्धाची घोषणा केली असताना तालिबानी सैनिक हिजबुल्लाला पाठिंबा देण्यासाठी युद्धाच्या मैदानात उतरले. नेतन्याहू म्हणाले होते की, गाझामधील हमासविरुद्ध चे युद्ध जवळजवळ संपले आहे, परंतु ते अद्याप पूर्णपणे संपलेले नाही.

गाझामधील हमासविरुद्धचे (Hamas) युद्ध अजूनही सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण मोठ्या प्रमाणात हमासच्या दहशतवाद्यांच्या खात्मानंतर गाझामध्ये आणखी इस्रायली सैनिकांची गरज उरलेली नाही. त्यामुळे आता आमचे सैन्य हिजबुल्लाचा बंदोबस्त करण्यासाठी सज्ज झाले आहे.

नेतन्याहू यांच्या या घोषणेनंतर इस्रायली सैनिकांनी लेबनॉन सीमेच्या दिशेने आगेकूच केली आहे, जे हिजबुल्लाविरुद्ध मोठ्या युद्धाच्या तयारीचे संकेत आहेत. यानंतर आता तालिबाननेही युद्धात उडी घेतली आहे. मात्र, तालिबानकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT