Israel-Hezbollah Tensions: इस्रायल आता हिजबुल्लाच्या निशाण्यावर, अलर्ट जारी; पुन्हा वाढलं टेन्शन

Israel-Hamas War: नववर्षाच्या मुहूर्तावर हमासविरुद्ध कडवा लढा देण्याची घोषणा करणाऱ्या इस्रायलला आणखी एका दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा धोका आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: नववर्षाच्या मुहूर्तावर हमासविरुद्ध कडवा लढा देण्याची घोषणा करणाऱ्या इस्रायलला आणखी एका दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा धोका आहे. मंगळवारी लेबनॉनने दावा केला की, हमासचा प्रमुख सालेह अल-अरौरी इस्रायली ड्रोन हल्ल्यात मारला गेला. याशिवाय, काही लेबनीज नागरिकही मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी हिजबुल्लासाठी हा मोठा झटका आहे. दरम्यान नेतन्याहू यांच्या सल्लागाराने असे वक्तव्य केले की, 'हे ज्याने केले त्याने हमासवर सर्जिकल स्ट्राइक केली.'

दरम्यान, बेरुतवरील हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे इस्रायलने आपल्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवले आहे, 2006 मध्ये हिजबुल्लासोबतच्या युद्धात झालेल्या पराभवाप्रमाणेच इस्त्रायलला आता पराभवाची भीती सतावत आहे. बेरुतवर हल्ला करुन इस्रायलने आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा इशारा हिजबुल्लाने दिला आहे. दरम्यान, सुमारे तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या युद्धात आता हमासचा सर्वात वरिष्ठ कमांडर सालेह अल-अरौरी याच्या हत्येमुळे इस्रायली लोकांचे मनोबल उंचावले आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हमासचा डेप्यूटी कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार, लेबनॉनमध्ये घेतले होते शरण; हिजबुल्ला चवताळला!

इस्रायलला आणखी एका दहशतवादी संघटनेचा धोका

मात्र, इस्त्रायली लष्कराने गाझामधील जमीनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. गेल्या 11 आठवड्यांतील युद्धात हमासचे अनेक प्रमुख कमांडर मारले गेले. ताज उदाहरण सालेह अल-अरौरीचं असून तो मंगळवारी बेरुतमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. दुसरीकडे, हिजबुल्ला लेबनॉनमधील दक्षिण बेरुतवर इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्याने संतप्त आहे. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी हिजबुल्लाह आणि हमासवर हल्ला चढवला. लेबनॉन सीमेवरील या हल्ल्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध नवे रुप धारण करु शकते.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इस्रायलने घेतला मोठा निर्णय; पण युद्ध चालूच राहणार!

गाझामध्ये युद्ध सुरु झाल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्यात जवळजवळ दररोज इस्रायल-लेबनीज सीमेवर गोळीबार होत आहे. मागील काही दिवसांपासून इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील बेरुतवर बॉम्बहल्ले वाढवले आहेत. त्यामुळे हिजबुल्ला संतप्त आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर आपल्या सार्वभौमत्वाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

इस्रायली अधिकार्‍यांनी अरौरी मारल्या गेलेल्या हल्ल्यावर भाष्य केले नाही, परंतु इस्रायलचे लष्करी प्रवक्ते, रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, "आम्ही प्रतिकारासाठी पूर्णपणे तयार आहोत." सूत्रांचे म्हणणे आहे की, इस्रायल सरकारला पराभवाच्या भीतीने पछाडले आहे. हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात 2006 मध्ये भयंकर युद्ध झाले होते. इस्त्रायलने याआधी एका दिवसात युद्ध संपुष्टात येईल अशी फुशारकी मारली होती, पण 33 दिवस चाललेल्या या नरसंहारात हजारो इस्रायली मारले गेले. नंतर इस्रायलने पराभव मान्य केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com