After 15 hours, restrictions on social media were lifted in Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

तब्बल 15 तासांनंतर श्रीलंकेमध्ये सोशल मीडियावरील निर्बंध हटवण्यात आले

36 तासांचा कर्फ्यू लागू केल्यानंतर व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर लादलेली बंदी उठवली.

दैनिक गोमन्तक

श्रीलंका सरकारने रविवारी देशभरात सार्वजनिक आणीबाणी घोषित केल्यानंतर आणि नियोजित सरकारविरोधी रॅलीच्या आधी 36 तासांचा कर्फ्यू लागू केल्यानंतर व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर लादलेली बंदी उठवली.

फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम, टोकटॉक, स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, व्हायबर, टेलिग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या सेवा तब्बल 15 तासांनंतर पूर्ववत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (After 15 hours, restrictions on social media were lifted in Sri Lanka

माहितीनुसार, अनेक तास वीज खंडित होऊन अन्न, जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि औषधांच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा निषेध करण्यासाठी कोलंबोमध्ये लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते.

नेटब्लॉक्स, सायबरसुरक्षा आणि इंटरनेटच्या प्रशासनावर देखरेख ठेवणारी वॉचडॉग संस्थेने, रविवारी मध्यरात्रीनंतर श्रीलंकेतील (Srilanka) फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, व्हायबर आणि यूट्यूबसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्बंध घालण्याची पुष्टी केली.

यापूर्वी, नेटब्लॉक्सने 29 मार्चपासून इंटरनेट प्रदाता डायलॉगवरील कनेक्टिव्हिटी पातळीत लक्षणीय घट नोंदवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT