Afghans Former Minister Syed Ahmed Sadat Now Works As Delivery Boy in Germany Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistanचे मंत्री जर्मनीत विकत आहेत पिझ्झा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घणी (Ashraf Ghani) यांनी सुद्धा आपला देश सोडला आहे.(Syed Ahmed Sadat)

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) राजवटीने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.या कब्जानंतर अनेक अफगाणी नागरिक देश सोडून बाहेर गेले आहेत. स्वतः अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घणी (Ashraf Ghani) यांनी सुद्धा आपला देश सोडला आहे. अशातच आता अफगाण मधल्या एका बड्या नेत्याच्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ते अफगाणिस्तानचे दळणवळण आणि आयटी मंत्री आहेत. (Afghans Former Minister Now Works As Delivery Boy in Germany)

अवघ्या एक वर्षापूर्वी, सय्यद अहमद शाह सादत (Syed Ahmed Sadat)यांनी दळणवळण आणि आयटी मंत्री म्हणून अफगाणिस्तानमध्ये आदरणीय पद भूषवले.आहे आणि आता ते जर्मनी मध्ये पिझ्झा डिलीवरीचे काम करत आहेत.

तथापि, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी 2020 मध्ये आपला देश सोडला आणि ते जर्मनीमध्ये स्थायिक झाले. लीपझीगर वोल्क्सझिटुंग वृत्तपत्रातील अहवालानुसार, सादत आता जर्मनीच्या लीपझिग शहरात फूड डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत.सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे ज्या फोटोत ते फूड डिलिव्हरी करताना दिसत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, सादात 2018 मध्ये अफगाणिस्तान सरकारमध्ये दळणवळण मंत्री झाले आणि तालिबानच्या ताब्यात येण्यापूर्वी 2020 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अफगाणिस्तानमधील दळणवळणाशी संबंधित समस्यांमध्ये मदत करण्यासाठी ते जर्मनीला गेले होते परंतु अशरफ घनी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी ते सोडले. जर्मनीमध्ये स्थायिक झाल्यानंतर, काही महिन्यांत त्याच्याकडे पैसे संपले आणि उदरनिर्वाहासाठी पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करण्यास भाग पाडले. ते आता त्यांच्या सायकलवर शहरभर फिरतात आणि घरोघरी जाऊन अन्न पुरवतात .

एका न्यूजच्या अहवालानुसार, माजी अफगाणिस्तान मंत्री म्हणाले की त्यांच्याकडे ऑक्सफोर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमध्ये दोन पदव्युत्तर पदवी आहेत. याशिवाय त्यांनी 13 देशांतील 20 हून अधिक कंपन्यांशी संप्रेषण क्षेत्रात काम केले आहे.

'सध्या मी अत्यंत साधे जीवन जगतो आहे. मला जर्मनीमध्ये सुरक्षित वाटते. मी लीपझिगमध्ये माझ्या कुटुंबासोबत असल्याचा मला आनंद आहे. मला पैसे वाचवायचे आहेत आणि जर्मन कोर्स करायचा आहे आणि पुढे अभ्यास करायचा आहे, 'असे सादत म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'मी अनेक नोकऱ्यांसाठी अर्ज केला पण प्रतिसाद मिळाला नाही. जर्मन टेलिकॉम कंपनीत काम करण्याचे माझे स्वप्न आहे. 'सादत यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर जास्त भाष्य करण्यास नकार दिला, परंतु ते म्हणाले की अशरफ घनी सरकार इतक्या लवकर पडेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT