मागील काही दिवसात अफगाणिस्तानतले(Afghanistan) वातावरण अगदी दहशतमय झाले आहे, अमेरिकेने सैन्याची घेतलेली माघार आणि त्यातच तालिबान्यांनी(Taliban) सुरू केलेले हल्ले यामुळे अफगाणिस्तान अस्थिर झालेले आहे. तालिबानी संघटनांना प्रतिउत्तर म्हणून अफगाणिस्तान आता हल्ले करत आहे अशातच आता अफगाणच्या संरक्षण अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, 'देशातील हेल्मंड आणि बदाखशान प्रांतांमध्ये 35 हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार करण्यात आले आहेत."(Air Strike On Taliban)
रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की आमच्या लढाऊ विमानांनी(Air Strike) तालिबान्यांना लक्ष्य केले आणि तालिबानी हेल्मडमधील नाद अली आणि संगिन जिल्ह्यात असल्याचे आम्हाला आढळून आले . एका न्यूज एजन्सीने ही माहिती दिली आहे असून या हवाई हल्ल्यात तालिबान्यांचा शस्त्र साठाही नष्ट करण्यातआला आहे. सध्या तालिबान्यांनी हेलमंदमधील 6 जिल्हे ताब्यात घेतले आहेत.
तसेच संरक्षण मंत्रालयाने या निवेदनात सुरक्षा अधिकारी किंवा जवान यांना कुठलीही इजा झाली नाही किंवा स्थानिक नागरिकांचेही कोणतेच नुकसान झाले नाही. तत्पूर्वी अफगाण सैन्याने बलख प्रांतातील काळदार आणि चमतल जिल्ह्यात 81 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. अफगाणिस्तानात मे पासून तालिबानी हिंसाचार पुन्हा सुरू झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.