Kabul Airport Afghanistan  Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan सोडण्यासाठी काबूल विमानतळावर हताश स्थानिकांची झुंबड

दैनिक गोमन्तक

काबूल: अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानी (Taliban) राजवट परत आली आहे. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. राष्ट्रपती अशरफ घनी (Ashraf Ghani) आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह देश सोडून पळून गेले आहेत. परिस्थिती बिघडल्यामुळे लोक येथून स्थलांतर करत आहेत. लोकांना काबूल (Kabul) सोडण्यासाठी लोकांना एकमात्र मार्ग उरला आहे तो म्हणजे काबूल विमानतळ (Airport). लोकं आपला जीव वाचवण्यासाठी आपलं लगेज सोडून पळत सुटले आहेत.

अफगाणिस्तानात गेल्या दोन दिवसात काय घडलं

1) तालिबानने लोकांना 17 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत घरातच राहण्यास सांगितले आहे. दरम्यान काबूल विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणेही बंद करण्यात आली आहेत, फक्त लष्करी विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

2) अमेरिकन सैन्यांनी आज हवेत गोळीबार केल्यानंतर काबूलमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. देश सोडून जाण्याच्या घाईत लोक बँकांमधून पैसे काढत आहेत. अनेक लोक व्हिसा मिळवण्यासाठी आपापल्या देशांच्या दूतावासाच्या फेऱ्या मारत आहेत.

3) अफगाणिस्तानच्या काही शहरांमध्ये अफगाण सुरक्षा दल आणि तालिबान यांच्यात अजूनही भीषण लढाई सुरु असली तरी, अनेक प्रांतांमध्ये, अफगाण सुरक्षा दलांनी तालिबान्यांसमोर आत्मसमर्पण केले.

4) घनी आणि मुत्सद्यांनी देश सोडल्यानंतर युद्ध संपले असल्याचे तालिबानने म्हटले आहे. आता तालिबान अफगाणिस्तानला इस्लामिक अमीरात बनवेल.

5) दरम्यान, अमेरिकेने आपले सुमारे 6,000 सैनिक काबूल विमानतळावर तैनात केले आहेत, जेणेकरून अमेरिकन नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय या देशातून बाहेर काढता येईल.

6) भारत देखील आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परताव्यासाठी काम करत आहे.भारताने काबूलमधील कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी 120 नागरिक विशेष विमानाने काबूलहून नवी दिल्लीला परतले.

7) ब्रिटन, फ्रान्स आणि इतर देशांनीही विमानतळांवर आपले सैनिक तैनात केले आहेत. प्रत्येकजण त्यांच्या दूतावासामध्ये काम करणाऱ्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

8) मात्र अद्याप रशिया आणि चीनची दूतावासाकडून असे प्रयत्न करताना दिसत नाहीत. रशियाने स्पष्टपणे घोषित केले आहे की देश सोडण्याचा त्यांचा हेतू नाही.

9) दरम्यान, लोकांनी शांतता राखण्यास सहकार्य करावे, कोणीही देश सोडण्याचा प्रयत्न करू नये. आमचे लढाऊ कोणालाही त्रास देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी सुद्धा कोणाच्याही घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन तालिबानने लोकांना केले.

10) हजारो नागरिक सध्या शहरातील मोकळ्या जागा, उद्याने आणि मैदानांत आश्रयाला आहेत. काहींनी त्यांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली. आजवर साठवलेली काही रक्कम काढण्यासाठी अनेकांनी बँकांच्या एटीएमसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र, अनेक एटीएममधून रक्कम काढता आली नाही.

11) तालिबानने काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिलखती वाहनातून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT